जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेवर केवळ भाजप आणि महायुतीचाच झेंडा फडकणार," असा ठाम विश्वास राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केला आहे. जालना येथे भाजप नेते भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मौलाना सय्यद कादरी ...
मुंबई महापालिका महायुतीच्याच ताब्यात येणार
मुंबई महापालिकेच्या आगामी रणसंग्रामावर बोलताना पंकज भोयर म्हणाले की, "ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या चर्चा केवळ राजकीय वर्तुळात आहेत. मात्र, मुंबईच्या जनतेने विकासाची कास धरली आहे. मोदी सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय यामुळे जनतेचा महायुतीवर विश्वास वाढला आहे. त्यामुळे विरोधक कितीही एकत्र आले तरी मुंबई महापालिका महायुतीच्याच ताब्यात येईल."
स्थानिक निवडणुकांच्या युतीवर वरिष्ठांचा शब्द अंतिम
जालना आणि राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "येथील स्थानिक परिस्थिती आणि राजकीय समीकरणे बघून पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील. या प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांची मतेही विचारात घेतली जातील. महायुती म्हणून लढायचे की नाही, याचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल."
नगरपरिषदेतील यशाची महापालिकेत पुनरावृत्ती
पंकज भोयर यांनी अलीकडेच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीतील यशाचा दाखला दिला. ते म्हणाले, "नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी केले आहे. ही विकासाची पोचपावती आहे. हीच लाट आगामी महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळेल आणि भाजप-महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील."





