मोहित सोमण: ओला इलेक्ट्रिक लिमिटेड (Ola Electric Limited) कंपनीने आज मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षात ओला इलेक्ट्रिक ग्राहकांच्या सेवेवबाबत अनेक तक्रारी आल्याचे पहायला मिळाले होते कंपनीने याविषयी लक्ष घालून आपली नवी हायपर सर्विस सेंटरची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण त्याच दिवशी २४ तासांच्या आत होण्यासाठी कंपनीने हायपर सर्विस एक्सटेंशन जाहीर केले आहे. उपलब्ध असलेल्या शोरूम अथवा सर्विस सेंटरला अद्यावत (Modified) करून उपलब्ध पायाभूत सुविधांची उभारणी केली जाण्याचीही घोषणा त्यांनी केली आहे. पात्र तक्रारदारांना अथवा ग्राहकांना विना शुल्क ही सेवा मिळणार असल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. एंड टू एंड प्रभावी सेवा देण्यासाठी कंपनी सज्ज असून बंगलोर येथे पहिले सेंटर येणार आहे असे कंपनीने यावेळी म्हटले.
कंपनीने 'वन डे गॅरंटी' या ब्रीदवाक्याअंतर्गत कंपनीने काही क्षणापूर्वी ही नवी घोषणा केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, जिथे नवी सेंटर नाहीत तेथे कंपनीच्या सर्व्हिस सेंटरचे विस्तारीकरण होणार असून जिथे सेंटर असतील तिथे सुविधा अद्यावत व आधुनिक असतील असे कंपनीने म्हटले. उदाहरणार्थ कंपनीकडून फ्री वायफाय, डिजिटल व्हिसिबिलिटी अशा प्रकारच्या सुविधा ग्राहकांना कंपनी देणार आहे.
याशिवाय हायपरसर्व्हिस सेंटरच्या वैशिष्ट्यांमध्ये ग्राहक लाउंज, चेक-इनपासून डिलिव्हरीपर्यंत फिचर्सचाही समावेश असणार आहे. बंगळूरमधील उद्घाटनानंतर,ओला कंपनीच्या निवडक सेवा केंद्रांना येत्या काही आठवड्यांत देशभरात हायपरसर्व्हिस सेंटरमध्ये वेगाने श्रेणीसुधारित करण्याची योजना आखत असल्याचेही कंपनीने म्हटले.
देशभरातील ईव्हीतील सेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा ह़त आहे. कंपनीने अलीकडेच हायपरसर्व्हिसला एका ओपन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित करण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे ओलाचे अस्सल सुटे भाग, निदान साधने आणि सेवा प्रशिक्षण मॉड्यूल्स केवळ तिच्या ग्राहकांसाठीच नव्हे, तर देशभरातील स्वतंत्र गॅरेज, मेकॅनिक आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी देखील उपलब्ध होतील असा दावा कंपनीने केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ओलाचे सुटे भाग थेट ओला इलेक्ट्रिक कस्टमर ॲप आणि वेबसाइटद्वारे खरेदी केले जाऊ शकतात ज्यामुळे प्रत्येक ग्राहक आणि गॅरेजला कोणत्याही मध्यस्थांशिवाय प्रमाणित घटक अथवा पार्ट मिळवता सहजपणे मिळवता येतील.
कंपनीच्या ग्राहकांना नव्या फिचर्सनुसार आता इन-ॲप सेवा अपॉइंटमेंटची घोषणा कंपनीने केली. म्हणजेच हे वैशिष्ट्य युजर्सला त्यांच्या पसंतीच्या सेवेचा स्लॉट निवडण्यासाठी, सेवेची स्थिती ट्रॅक करण्याची आणि ओला इलेक्ट्रिक ॲपमध्येच सर्व सेवा-संबंधित गरजा शोधण्यासाठी सहकार्य करते. संपूर्ण सेवा प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्मवर आणल्यामुळे, ग्राहक पारंपारिक सेवा बुकिंग पद्धतींची गैरसोय टाळू शकतात.
याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की,'सध्या सुरू असलेल्या सेवा अपग्रेडचा एक भाग म्हणून, आम्ही सेवा अनुभवाच्या अनेक मूलभूत पैलूंची पुनरचना करत आहोत. आम्ही याला ओलाचा एक मुख्य भाग मानतो आणि त्यासाठी उत्पादनाइतक्याच नावीन्याची गरज आहे. हायपरसर्व्हिस सेंटर्सद्वारे, आम्ही एक नवीन बेंचमार्क स्थापित करत आहोत त्याच दिवशी सेवेची हमीचा यात समावेश आहे. कोणत्याही ग्राहकासाठी कोणताही अतिरिक्त खर्च नाही. हे तंत्रज्ञान प्रक्रियेची पुनर्रचना आणि प्रमाणाचा (Standards) वापर करून अडथळे दूर करण्याबाबत आहे आणि प्रत्येक ओला ग्राहकाला वेगवान,सोपा आणि अधिक पारदर्शक सेवेचा अनुभव देण्याबद्दल आहे.'
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या (ईव्ही)इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून ओळखली जाते.कंपनी बॅटरी सेलसह ईव्ही आणि त्यांच्या घटकांसाठी तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे (व्हर्टिकल इंटिग्रेशन) करते. तामिळनाडू येथील ओला फ्युचरफॅक्टरी, जिथे ईव्ही आणि महत्त्वाचे घटक तयार केले जातात, तेथे कंपनी भारताचे सर्वात मोठे ईव्ही केंद्र विकसित करत आहे.कंपनीच्या मते, याला ओलाच्या बंगळूरस्थित बॅटरी इनोव्हेशन सेंटर (BIC) द्वारे संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. कंपनीच्या शेअर्समध्ये सकाळच्या सत्रात ४% पर्यंत वाढ झाली आहे. दुपारी १.१९ वाजता कंपनीच्या शेअर्समध्ये २% वाढ झाल्याने शेअर ३५.२० पातळीवर पोहोचला होता.






