Tuesday, December 23, 2025

निफ्टी एक्सपायरी पार्श्वभूमीवर 'व्यापक' शेअर बाजार विश्लेषण: तज्ञांच्या मते, बाजार मजबूत तरीही का कोसळला? वाचा सविस्तर

निफ्टी एक्सपायरी पार्श्वभूमीवर 'व्यापक' शेअर बाजार विश्लेषण: तज्ञांच्या मते, बाजार मजबूत तरीही का कोसळला? वाचा सविस्तर

मोहित सोमण: अखेरच्या सत्रात शेअर बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. किरकोळ घसरणीसह सेन्सेक्स ४२.६४ अंकाने घसरत ८५५२४.८४ पातळीवर व निफ्टीत ४.७५ अंकांची वाढ झाल्याने २६१७७ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टीत विकली एक्सपायरीसह आशियाई बाजारातील संमिश्र संकेत, दोन दिवसांच्या रॅलीनंतर झालेले नफा बुकिंग व युएससह जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी बाळगलेली सावधता अशा एकत्रित कारणांमुळे बाजार 'लाल' रंगातच बंद झाला आहे. मात्र बाजारातील फंडामेंटल मूलभूत पातळीवर सक्षम राहिल्याचे वाढलेल्या ट्रेडिंग व्हॉल्यूमुळे स्पष्ट झाले आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण आयटी, हेल्थकेअर, पीएसयु बँक, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम शेअर्समध्ये झाल्याचे दिसून आले. बँक निर्देशांकातही सकाळच्या वाढीनंतर संध्याकाळपर्यंत घसरण झाली ज्यामुळे बाजाराला आज सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. दरम्यान काही प्रमाणात केमिकल्स, फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक, फायनांशियल सर्विसेस २५/५०, मिडिया शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा फायदा बाजारात झाला.

बाजारातील घसरण निर्देशांकाने दर्शविली असली तरी बीएसईत (Bombay Stock Exchange BSE) मध्ये एकूण ४३६५ शेअर्समध्ये १८९१ शेअर्समध्ये घसरण झाली असून उर्वरित २२९३ शेअर्समध्ये वाढ झाली आहे.एनएसईत (National Stock Exchange NSE) ३२६४ शेअर्समध्ये १८३५ शेअर्समध्ये वाढ झाली असून उर्वरित १३२१ शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.०३%), जकार्ता कंपोझिट (०.७१%), निकेयी २२५ (०.०८%) हेंगसेंग (०.०८%) निर्देशांकात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ तैवान वेटेड (०.५७%), कोसपी (०.२८%), स्ट्रेट टाईम्स (०.६२%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात कालच्या घसरणीनंतर वाढ झाली आहे. तिन्ही डाऊ जोन्स (०.१५%), एस अँड पी ५०० (०.८०%), नासडाक (०.५३%) निर्देशांकात वाढ सकारात्मक वातावरणामुळे झाल्याचे दिसत आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ज्युपिटर वॅगन्स (८.२०%), गोदावरी पॉवर (७.३१%), आयएफसीआय (७.२१%), चोलामंडलम इन्व्हेसमेंट फायनान्स (५.९१%), रिटस (४.०२%), एनएमडीसी (३.८३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण कोफोर्ज (४.७४%), लेंटट व्ह्यू (३.७१%), सीपीसीएल (३.५३%), कजारिया सिरॅमिक (३.१७%), न्यूलँड लॅब्स (२.६४%), प्रा इंडस्ट्रीज (२.६१%), पीव्हीआर आयनॉक्स (२.०६%), मदर्सन वायरिंग (१.६०%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'३ डिसेंबर रोजी एका अस्थिर सत्रानंतर भारतीय इक्विटी बेंचमार्क जवळपास स्थिर पातळीवर बंद झाले, ज्यात साप्ताहिक F&O एक्सपायरीमुळे इंट्राडे चढ-उतारात भर पडली. देशांतर्गत मागणीतील सुधारणेच्या अंदाजाने काहीसा आधार दिला असला तरी, जागतिक व्यापार वाटाघाटींमधील अनिश्चितता आणि रुपयाच्या वाटचालीमुळे बाजारातील भावनांवर दबाव कायम राहिला. सत्राच्या अखेरीस, सेन्सेक्स ४२.६४ अंकांनी, म्हणजेच ०.०५ टक्क्यांनी घसरून ८५५२४.८४ पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ४.७५ अंकांनी, म्हणजेच ०.०२ टक्क्यांनी वाढून २६१७७.१५ पातळीवर पोहोचला. मिडकॅप निर्देशांक स्थिर राहिला, तर स्मॉल-कॅप निर्देशांकाने ०.३७ टक्क्यांची माफक वाढ नोंदवली. क्षेत्रीय पातळीवर, आयटी, आरोग्यसेवा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये ०.२ ते ०.८ टक्क्यांची घसरण झाली, तर मीडिया क्षेत्रात ०.६ टक्क्यांची वाढ झाली. धातू आणि सार्वजनिक क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे ०.५ टक्क्यांची वाढ झाली आणि ऊर्जा निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वाढला.'

अखेरच्या सत्रातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'स्टॉक-विशिष्ट संबंधित हालचालींच्या दरम्यान, निर्देशांकाने उच्चांक आणि नीचांक दोन्ही वाढलेल्या पातळीवर ठेवत, सकारात्मक कल दर्शवणारी 'हाय वेव्ह कँडल' तयार केली, जी बाजारातील स्थिरीकरणाचे संकेत देत आहे. निफ्टीने सलग चौथ्या सत्रात आपली तेजी कायम ठेवली आहे आणि कोणत्याही उलटफेरच्या संकेतांअभावी, तो मागील तीन आठवड्यांच्या स्थिरीकरणातील श्रेणीवरच्या बँडकडे, म्हणजेच २६३०० पातळीच्या पातळीकडे वाटचाल करण्यास सज्ज आहे. २६३०० पातळीच्या वर निर्णायक क्लोजिंग ब्रेकआउट झाल्यास, २६५०० पातळीच्या क्षेत्राकडे पुढील तेजीची शक्यता निर्माण होईल. दुसरीकडे, तात्काळ आधार (Immediate Support) सोमवारच्या गॅप-अप झोनजवळ, म्हणजेच २६००० पातळीच्या पातळीवर आहे आणि या पातळीच्यावर टिकून राहिलेला व्यापार बाजाराची रचना सकारात्मक ठेवेल अशी अपेक्षा आहे. तर अल्पकालीन आधार (Short Support) २५७००-२५८०० पातळीच्या पातळीवर आहे.

बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, स्टॉक-विशिष्ट हालचालींदरम्यान, निर्देशांकाने उच्चांक आणि नीचांक दोन्ही वाढवत एक 'हाय वेव्ह कँडल' तयार केली, जी बाजारातील स्थिरीकरणाचे संकेत देत आहे. निर्देशांक अलीकडील ट्रेंडलाइन ब्रेकआउट क्षेत्राभोवती स्थिरावताना दिसत आहे. येत्या काही आठवड्यांत निर्देशांक स्थिरीकरण वाढवेल आणि ५८५००-६०१०० पातळीच्या श्रेणीत एक आधार तयार करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यातील ५९५३३ पातळीच्या उच्चांकाच्या वरची तेजी येत्या काही आठवड्यांत निर्देशांकाला ६०१०० या अलीकडील सर्वकालीन उच्चांकाकडे (All time High) घेऊन जाईल. गेल्या २ महिन्यांतील संपूर्ण तेजी एका विशिष्ट चॅनलमध्ये राहिली आहे, जी उच्च स्तरांवरही सतत मागणी असल्याचे दर्शवते. ५० दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) आणि अलीकडील ब्रेकआउट क्षेत्राच्या संगमामुळे (Integration) ५८३००-५८६०० या स्तरांवर महत्त्वाची आधार पातळी आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विश्लेषक सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,' माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या विक्रीच्या दबावामुळे आणि नफावसुलीमुळे तेजीला मर्यादा आल्याने, भारतीय इक्विटी बेंचमार्क्स किरकोळ वाढीसह सत्राच्या अखेरीस बंद झाले, ज्यात निफ्टी 0.02% वाढीसह बंद झाला. साप्ताहिक डेरिव्हेटिव्ह्जच्या मुदतीपूर्वी बाजारात सावधगिरीचे वातावरण होते ज्यामुळे संपूर्ण सत्रात अस्थिरता कायम राहिली.

व्यापक बाजार तुलनेने स्थिर राहिले, निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक स्थिर पातळीवर बंद झाला, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला, जो निवडक खरेदीची आवड दर्शवतो. क्षेत्रीय कामगिरी देखील संमिश्र होती. निफ्टी मीडिया सर्वाधिक वाढणारा क्षेत्र ठरला जो +०.८% वाढला, तर निफ्टी मेटल ०.५% वाढला, ज्याला फेरस आणि नॉन-फेरस दोन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये झालेल्या व्यापक खरेदीचा पाठिंबा मिळाला. मेटल शेअर्सनी सलग पाचव्या सत्रात आपली तेजी कायम ठेवली.

दुसरीकडे, सलग चार सत्रांच्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे निफ्टी आयटी ०.८% घसरला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक देखील ०.४% घसरणीसह खाली बंद झाला, ज्यामुळे बाजाराच्या काही निवडक क्षेत्रांमध्ये एकूणच मंदीचे वातावरण दिसून आले.धोरणात्मक आघाडीवर, भारताने न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार कराराच्या निष्कर्षाची घोषणा केल्यामुळे बाजारातील भावनांना पाठिंबा मिळाला. या करारामुळे भारतीय वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल आणि पुढील १५ वर्षांत २० अब्ज डॉलर्सच्या नियोजित गुंतवणुकीचा ओघ अपेक्षित आहे.

पुढे पाहता, बाजार आज नंतर अमेरिकेच्या टिकाऊ वस्तूंच्या ऑर्डर आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या आकडेवारीसह महत्त्वाच्या जागतिक आर्थिक डेटावर लक्ष ठेवतील, त्यानंतर उद्या प्रारंभिक बेरोजगारीच्या दाव्यांची आकडेवारी येईल. एकूणच, सुट्ट्यांमुळे लहान झालेल्या या आठवड्यात व्यापाराचे प्रमाण कमी राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे, आणि अनुकूल जागतिक संकेतांच्या पाठिंब्याने बाजार उच्च पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता आहे.'

आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष वरिष्ठ विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कमजोर डॉलर निर्देशांक (सुमारे ९८.४५) आणि देशांतर्गत जोखमीच्या भावनांमध्ये झालेल्या सुधारणेमुळे रुपया ८९.६५ रूपयांच्या पातळीजवळ स्थिर राहिला आणि ८९.४५–८९.६५ रूपयांच्या मर्यादित पट्ट्यात व्यवहार करत होता. गेल्या आठवड्यात ९१ रूपयांच्या नीचांकी पातळीजवळ झालेल्या हस्तक्षेप-प्रेरित खरेदीनंतर एक स्पष्ट उलटफेर दिसून आला आहे, ज्यामुळे सध्या चलन स्थिर झाले आहे. पीसीई किंमत निर्देशांक, नवीन घरांची विक्री आणि साप्ताहिक बेरोजगारीचे दावे यांसारख्या महत्त्वाच्या अमेरिकन आकडेवारीकडे लक्ष लागले आहे, ज्यामुळे बाजारात पुन्हा अस्थिरता येऊ शकते. तांत्रिकदृष्ट्या, ९०.०० रूपयांच्या पातळीजवळ आधार आहे, तर ८९.२५ रूपयांच्या पातळीजवळ प्रतिकार दिसून येत आहे.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याने जोरदार सकारात्मक व्यापार केला, एमसीएक्सवर १५०० रुपयांची वाढ होऊन ते १३८२५० रूपयांच्या जवळपास पोहोचले, तर डॉलरच्या नरमलेल्या स्थितीमुळे आणि पुढील व्याजदर कपातीच्या वाढत्या अपेक्षांमुळे कॉमेक्सवरील सोन्याच्या दरात ४० डॉलरची वाढ होऊन तो सुमारे ४४८५ डॉलरवर पोहोचला. अलीकडील तीव्र तेजीनंतर 'ओव्हरबॉट' क्षेत्रात प्रवेश करूनही, व्यापक कल कायम आहे. जोपर्यंत किमती १३२००० पातळीच्या पातळीच्या वर टिकून राहतील, तोपर्यंत सोन्याचा तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे आणि कोणताही अल्प-मुदतीचा घसरण हा ट्रेंड बदलणारा नसून केवळ सुधारणात्मक मानला जाईल.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात मर्यादित श्रेणीत व्यवहार झाले आणि तो सपाट पातळीवर बंद झाला. बहुतेक क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला, तरीही वित्तीय आणि एफएमसीजी क्षेत्रांनी किरकोळ आधार दिला. पुढे, गुंतवणूकदार पुढील कमाईच्या हंगामासाठी तयारी करत आहेत आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणाबद्दलच्या बदलत्या अपेक्षांवर लक्ष ठेवून आहेत, कारण जानेवारीच्या बैठकीसाठी व्याजदर कपातीच्या शक्यता हळूहळू वाढत आहेत. देशांतर्गत मागणीच्या सुधारलेल्या दृष्टिकोनातून मूलभूत आधार मिळत असला तरी, जागतिक व्यापार वाटाघाटी आणि रुपयाच्या वाटचालीबद्दलची अनिश्चितता बाजाराच्या भावनांवर परिणाम करत राहील.'

आजचे टेक्निकल विश्लेषण काय?

आजच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक रिसर्च विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,'गेल्या काही सत्रांमध्ये मोठी तेजी दाखवल्यानंतर, निफ्टीने मंगळवारी आपला तेजीचा कल काहीसा मंदावला आणि दिवसभर एका मर्यादित पातळीत व्यवहार करत बंद झाला. सकारात्मक पातळीवर सुरुवात केल्यानंतर, बाजाराने सत्राच्या बहुतेक भागासाठी एका अरुंद मर्यादेत हालचाल केली. सत्राच्या शेवटी थोडीशी नरमाई दिसून आली आणि निफ्टी अखेरीस जवळपास स्थिर ते किंचित सकारात्मक पातळीवर बंद झाला.

दैनंदिन आलेखावर (Daily Chart) एक लहान लाल कँडल तयार झाली ज्याला वर आणि खाली लहानशी सावली होती. तांत्रिकदृष्ट्या ही बाजाराची हालचाल अलीकडील मोठ्या तेजीनंतर विश्रांतीच्या स्वरूपाचा पॅटर्न तयार झाल्याचे दर्शवते. ही बाजाराची हालचाल तेजीच्या ट्रेंडच्या सातत्याचा पॅटर्न असू शकते. निफ्टीचा मूळ कल सकारात्मक राहिला आहे. १ किंवा २ सत्रांच्या मर्यादित हालचाली किंवा स्थिरीकरणानंतर बाजार आपली तेजी पुन्हा सुरू करेल अशी अपेक्षा आहे. तात्काळ आधार पातळी २६०५० पातळीवर आहे. पुढील तेजीची पातळी २६३००-२६४०० पातळीच्या आसपास पाहता येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा