Tuesday, December 23, 2025

Market Opening Bell: सकाळच्या सत्रात शेअर बाजारासह आयटी, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण मात्र बँक निर्देशांकात वाढ! विकली एक्सपायरीसह 'या' कारणामुळे घसरण 

Market Opening Bell: सकाळच्या सत्रात शेअर बाजारासह आयटी, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण मात्र बँक निर्देशांकात वाढ! विकली एक्सपायरीसह 'या' कारणामुळे घसरण 

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १२१.४१ व निफ्टी ५० हा २८.४० अंकांने घसरला आहे. प्रामुख्याने आज युएस बाजारात तीन दिवसांच्या वाढीने घसरणीचा कौल दाखवला असताना आशियाई बाजारात आज सिंगापूरची महागाई आकडेवारी समोर येणार आहे. याच पार्श्वभूमीवर इस्त्राईल व इराण यांच्यातील वाद, युएस भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर अद्याप अनिश्चितता व नफा बुकिंग यामुळे बाजारात सकाळी घसरण झाली. आयटी, रिअल्टी शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटका बाजारात दिसला. मात्र सेन्सेक्स व निफ्टी बँकेतील किरकोळ वाढीमुळे बाजारातील घसरण मर्यादित झाली आहे. यासह आज निफ्टी विकली एक्सपायरीचा दिवस असल्याने बाजारात मरगळ कायम आहे.

सकाळी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.५५%), तेल व गॅस (०.३९%), पीएसयु बँक (०.२७%) निर्देशांकात झाली आहे तर सर्वाधिक घसरण मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (०.९१%), रिअल्टी (०.३१%), आयटी (१.३०%) निर्देशांकात झाली आहे. सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीतही घसरण झाल्याचे दिसून आले.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एकम ड्रग्स (७.६३%), चोलामंडलम इन्व्हेसमेंट फायनान्स (५.६२%), जीएमडीसी (४.९६%), रामकृष्ण फोर्ज (३.२२%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण कोफोर्ज (४.७८%), न्यूलँड लॅब्स (३.२३%), कजारिया सिरॅमिक (१.९३%), एसीसी (१.९३%), इन्फोसिस (१.८५%), रिलायन्स पॉवर (१.७३%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >