Thursday, March 26, 2026

KSH International IPO Listing: गुंतवणूकदारांचे पेसै पाण्यात! आयपीओचे बाजारात खराब पदार्पण 'इतक्या' रूपयाने शेअर सूचीबद्ध

KSH International IPO Listing: गुंतवणूकदारांचे पेसै पाण्यात! आयपीओचे बाजारात खराब पदार्पण 'इतक्या' रूपयाने शेअर सूचीबद्ध

मोहित सोमण:केएसएच इंटरनॅशनल कंपनीचे आज बाजारात अयशस्वी पदार्पण झाले आहे. त्यामुळे या आयपीओतील गुंतवणूकदारांची घोर निराशा आज झाली आहे. ३८४ रूपये प्रति शेअर प्राईज बँड असलेल्या मुख्य किंमतीच्या तुलनेत शेअर ३७० रूपये प्रति शेअरवर सूचीबद्ध (Listed) झाला आहे. ६४४ कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओला ०.८७ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. एकूण पब्लिक इशूपैकी रिटेल गुंतवणूकदारांकडून ०.९१ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.१२ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.४४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. त्यामुळे अयशस्वी सबस्क्रिप्शनसह अयशस्वी लिस्टिंगही या शेअरचे झाले. एकूण सूचीबद्ध होण्यापूर्वी असलेल्या प्राईज बँडच्या तुलनेत शेअरची किंमत ३.६५% खालावली आहे. खरं तर ग्रे मार्केट बाजारात शेअरची किंमत ३८२ रूपये म्हणजेच २ रूपये प्रति शेअर प्रिमियम सुरु होती. मात्र त्यामुळे आज गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे.

१६ ते १८ डिसेंबर कालावधीत कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान १४९७६ रूपये गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. ६४४.४५ कोटी आयपीओतील १.०९ कोटी शेअर (४२० कोटी) फ्रेश इशू असून उर्वरित ०.५८ कोटी शेअर (२२४.४५ कोटी) शेअर ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून दाखल झाले होते.

१९७९ मध्ये स्थापन झालेली केएसएच इंटरनॅशनल लिमिटेड ही भारतातील मॅग्नेट वाइंडिंग वायर्सची भारतातील तिसरी सर्वात मोठी उत्पादक आणि सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे. केएसएच इंटरनॅशनल 'केएसएच' ब्रँड अंतर्गत कार्यरत असून वीज, अक्षय ऊर्जा, रेल्वे, ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये ओईएमना कंपनी मटेरियलचा पुरवठा करते.कंपनीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये गोल इनॅमेल्ड कॉपर/अ‍ॅल्युमिनियम मॅग्नेट वाइंडिंग वायर्स, पेपर इन्सल्टेड रेक्टॅंग्युलर कॉपर/अ‍ॅल्युमिनियम मॅग्नेट वाइंडिंग वायर्स, कंटिन्युअली ट्रान्सपोज्ड कंडक्टर्स, आयताकृती इनॅमेल्ड कॉपर/अ‍ॅल्युमिनियम मॅग्नेट वाइंडिंग वायर्स आणि बंच्ड पेपर इन्सुलेटेड कॉपर मॅग्नेट वाइंडिंग वायर्स यांचा समावेश आहे. आयपीओआधी कंपनीला २१३ कोटीची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून मिळाली होती.कंपनीचे प्रवर्तक कुशल सुब्बय्या हेगडे, पुष्पा कुशल हेगडे, राजेश कुशल हेगडे, रोहित कुशल हेगडे, श्रीमती राखी गिरिजा शेट्टी, धौलागिरी फॅमिली ट्रस्ट, एव्हरेस्ट फॅमिली ट्रस्ट, मकालू फॅमिली ट्रस्ट, ब्रॉड फॅमिली ट्रस्ट,अन्नपूर्णा फॅमिली ट्रस्ट, कांचनजंगा फॅमिली ट्रस्ट आणि वॉटरलू इंडस्ट्रियल पार्क VI प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

आर्थिक स्थिती पाहिल्यास कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ३९% अधिक महसूल प्राप्त झाला होता तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ८२% अधिक वाढ झाली होती. दरम्यान यंदा सप्टेंबर तिमाहीत मात्र करोत्तर नफ्यात ६७.९९ कोटीवर घसरण झाली असून कंपनीच्या ईबीटात १२२.५३ कोटीवरून ४०.२८ कोटींवर घसरण झाली होती. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) २६०१.८१ कोटी रूपये आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा