Tuesday, December 23, 2025

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश व्यास यांनी मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. धर्मेश व्यास हे माजी नगरसेवक असून काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान पदाधिकारी होते. काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या फळीतील हे पदाधिकारी होते.

धर्मेश व्यास हे सांताक्रुज पूर्व येथील प्रभात कॉलनी, आनंद नगर परिसरातील प्रभाग क्रमांक ८१ मधून २००७ ते २०१२ या कालावधी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तर त्याआधीच्या कालावधीत ते नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र बाद झाल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली होती. धर्मेश व्यास वकील असून अनेकदा काँग्रेसची कायदेशीर बाबी त्यांनी हाताळल्या आहेत.

गुरुदास कामत यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू असलेले समीर देसाई यांनी प्रथम भाजपा आणि नंतर उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. तर राजहंस सिंह यांनी भाजपात याआधीच प्रवेश करत ते भाजपावासी झाले आहेत. त्यानंतर आता धर्मेश व्यास यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. तर शिवजी सिंह आणि अमरजित सिंह मनहास हे अजूनही काँग्रेसमध्ये राहिले आहेत. व्यास यांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपा नेते प्रवीण दरेकर, भाजपाचे नेते मधु चव्हाण, माजी नगरसेवक महेश पारकर, आदी उपस्थित होते. पक्ष प्रवेश केल्यानंतर व्यास यांनी भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि मंत्री ॲड आशिष शेलार यांची भेट घेतली. यावर्षी शेलार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा