मोहित सोमण:चोलामंडलम इन्व्हेसमेंट अँड फायनान्स लिमिटेड (Cholamandalam Investment and Finance) कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त ६.४८% इंट्राडे वाढ झाल्याने शेअर १६८७.५० या सर्वोच्च पातळीवर (All time High) पोहोचला होता. सकाळी १० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ६.२०% वाढ झाली असून १६८३.२० रूपयांवर प्रति शेअर पातळी पोहोचली आहे. प्रामुख्याने आज कंपनीने क्रोबापोस्टने लिहिलेल्या लेखाचे आक्रमकपणे खंडन केले ज्यामध्ये कंपनीवर अनुपालन टाळून माहिती लपपवल्याचे, लेखा परीक्षकाला अधिक फी दाखवत हिशोबात फेरफार केल्याचे व पाच वर्षांत २५०८९ कोटींच्या रोख रकमेच्या मुदत ठेवी जमवून ठेवल्याचा आरोप केला होता. कंपनीने यावेळी सगळ्याच आरोपांचे स्पष्टीकरण आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत केले आहे. संबंधित आरोप चुकीचे खोटे व 'दिशाभूल' करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
कोब्रा पोस्टच्या अहवालानुसार, मुरुगप्पा ग्रुपच्या कंपन्यांसोबत झालेल्या व्यवहारांसह, एकूण १०२६२ कोटी रुपयांचे संबंधित पक्षांशी (Related Parties) व्यवहार झाले आहेत. कोब्रा पोस्टने याविषयी कंपनीची अधिक सखोल नियामक तपासणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मुख्य समुह असलेल्या (Group of Companies) मुरुगप्पा ग्रुपने गेल्या पाच वर्षांत २५०८९ कोटी रुपयांच्या रोख ठेवी जमा केल्या आहेत. कोब्रापोस्टच्या मते या ठेवी 'उच्च', 'असामान्य' सीआयएफसीसाठी मालमत्तेच्या गुणवत्तेच्या जोखमीचे सूचक आहेत. त्यामुळे या ठेवीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
लेखापरीक्षकांच्या शुल्कातील तीव्र वाढीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे, कंपनी व चोला एमएस इन्शुरन्सने केलेल्या संबंधित पक्षांच्या खुलाशांवरून माहिती लपवणे आणि नियमांचे पालन न केल्याचे अनेक आरोप समोर आले आहेत कारण कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ ते २०२५ दरम्यान विमा विकून कमिशन म्हणून ९४२ कोटी रुपये कमावल्याचे कोब्रा पोस्टने आपल्या आरोपात निरीक्षण नोंदवले होते. त्यांनी कंपनीवर आरोप करताना मुरुगप्पा कुटुंबातील सदस्यांना केलेल्या देयकांबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे ज्याला कोब्रापोस्टने अवास्तव अथवा अधिक जास्तीचे म्हटले असून क्रेडिट रेटिंग एजन्सींना केलेल्या देयकांबद्दलही प्रश्नचिन्हाबाबतही कोब्रा पोस्टने प्रश्न उपस्थित केले होते.
यालाच उत्तर देताना,'कंपनी प्रामुख्याने भारतातील शहरे आणि गावांमध्ये पसरलेल्या १७०० पेक्षा जास्त शाखांमधून, ५० लाखांहून लघू वाहतूक चालक आणि स्वयंरोजगार असणाऱ्या गैर-व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करते. हे गहाण आणि असुरक्षित कर्ज यांसारख्या कर्ज देण्याच्या श्रेणींमध्ये केले जाते ज्यामुळे भारतातील ग्रामीण आणि निम-शहरी भागांतील वंचित घटकांसाठी आर्थिक समावेशकता साधली जाते. असे कर्जदार रोखीत कमाई करतात आणि आम्हाला देय असलेले ईएमआय देखील रोखीतच भरतात. अशा प्रकारे रोखीत गोळा केलेली रक्कम बँकांमध्ये जमा केली जाते. ही वसुली प्रक्रिया आणि रक्कम अंतर्गत आणि बाह्य तपासणीच्या अधीन आहे. हे आमच्या मजबूत अंतर्गत प्रणालींच्या अंतर्गत येते आणि वैधानिक लेखापरीक्षणाच्या अधीन आहे. अशा वसुलीसाठी सर्व केवायसी आणि आयकर अनुपालन लागू कायदेशीर आवश्यकतांनुसार केले जाते.
वरील व्यवहारांमुळे काही व्यक्तींना फायदा होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कंपनी असे विधान स्पष्टपणे फेटाळून लावते. कंपनीच्या (CIFCL) च्या संचालक मंडळाच्या सदस्यांना, प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना केलेले सर्व पेमेंट लागू कायद्यानुसार केले गेले आहेत आणि कंपनीच्या भागधारकांना त्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.' असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
रेटिंगवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना कंपनीने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये रेटिंग एजन्सींना केलेल्या पेमेंटच्या संबंधात प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. सर्व कर्जे रेटिंगच्या अधीन असतात. अशा रेटिंगशिवाय, सावकार कंपनीला पैसे देणार नाहीत. ही एक प्रमाणित उद्योग प्रथा आहे. काही वर्षांमध्ये, जिथे कर्जाची आकडेवारी जास्त असते किंवा कंपनीने अधिक कर्ज घेतले असते, तिथे अधिक रेटिंग्स असतील आणि अशा एजन्सींना जास्त रेटिंग खर्च दिला जाईल. त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी, सीएसआर योगदान संबंधित स्वयंसेवी संस्था,अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना कामाच्या करारांच्या स्वरूपात दिले जाते. कायद्यानुसार सीएसआर पेमेंट करणे बंधनकारक आहे. त्यामुळे काही तथ्ये नकारात्मक पद्धतीने 'निवडकपणे' सादर केली गेली आहेत असाही प्रत्यारोप कंपनीने केला असून या संस्थेच्या फायद्यासाठी औद्योगिक पद्धतींना चुकीच्या पद्धतीने मांडले गेले असल्याचा दावा चोवामंडलम कंपनीने केला.
अनुपालनावर (Compliance) भाष्य करताना,'आम्ही पुष्टी करतो की कंपनीचे सर्व कामकाज देशाच्या कायद्यांनुसार आणि लागू असलेल्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन करून केले जाते. आम्ही आमच्या गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांशी पारदर्शक संवाद साधण्यास वचनबद्ध आहोत आणि म्हणूनच आम्ही हे स्पष्टीकरण जारी केले आहे. आमच्या प्रतिष्ठेला आणि सचोटीला हानी पोहोचवणाऱ्या अशा संस्थेविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.' असे म्हटले आहे.
दरम्यान प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,कोब्रापोस्टच्या अहवालातील आरोपांवर विश्लेषकांनी प्रतिक्रिया दिली आहे. २५००० कोटी रुपयांच्या रोख ठेवी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंटच्या एकूण वसुलीच्या १२% पेक्षा कमी आहेत आणि त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, कारण एकूण वसुलीमध्ये रोख वसुलीचा वाटा सुमारे २०% ते ४०% असतो.
विश्लेषकांनी चोला एमएसने विविध ग्रुप कंपन्यांना केलेले पेमेंट ही उद्योगातील एक सामान्य प्रथा असून त्यांना लेखापरीक्षकांचे मानधन जास्त वाटत नाही असे म्हटले आहे. सकाळच्या सत्रात शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा शेअर्सच्या किंमती रिअव्हर झाल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या शेअर १००-दिवसांच्या आणि २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर व्यवहार करत असतानाही ही वाढ ५ दिवसांच्या, २० दिवसांच्या, ५० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली चार्टवर दर्शविली जात आहे. दरम्यान या परिस्थितीचा विचार केल्यास जरी स्टॉकने काही प्रमाणात सुधारणा केली असली तरी, तो पुढील काही नजीकच्या काळात अजूनही शेअरला प्रतिरोध पातळींचा (Resistance Level) तोंड द्यावे लागेल असे दिसते.






