Tuesday, December 23, 2025

प्रकाश आणि शिक्षणाने उजळलेला एक खास दिवस

प्रकाश आणि शिक्षणाने उजळलेला एक खास दिवस

मुंबई : मुंबईतील विविध भागांतील ६८० हून अधिक मुलांनी रिलायन्स फाउंडेशनच्या वार्षिक एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ESA) डे निमित्त हॅम्लेज वंडरलँड™ येथे मनोरंजनासोबतच शिक्षणाने भरलेला, आनंददायी खास दिवस अनुभवला. मुलांसोबत या विशेष कार्यक्रमात संस्थेच्या संचालिका ईशा अंबानी पण सहभागी झाल्या होत्या.

“मुलांना जेव्हा आनंददायी अनुभव मिळतात, तेव्हा त्यांच्यात आकांक्षा निर्माण होतात, व्यक्तिमत्त्व घडते आणि त्यांची क्षमता विकसित होते, असा रिलायन्स फाउंडेशनचा विश्वास आहे. आमचा ESA कार्यक्रम याच हेतूने सुरू केल्याचे रिलायन्स फाउंडेशनच्या संचालिका ईशा अंबानी महणाल्या.

यंदा मुलांनी हॅम्लेज वंडरलँड येथील लाईट अटेलियरचाही अनुभव घेतला. प्रकाश आणि सावल्यांशी खेळत, प्रदर्शनातून शिकताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे खरोखरच अद्भुत होते. जिओ वर्ल्ड गार्डनमधील हॅम्लेज वंडरलँड™ कार्निव्हलमध्ये मुलांनी डिनो वर्ल्ड, एलिव्हेटर टू द नॉर्थ पोल, जायंट फेरिस व्हील, कॅरोसेल, बंपर कार्स, वंडर बलून, वंडर बोट तसेच इतर अनेक आकर्षक खेळांचा मनसोक्त आनंद घेतला.

यंदाच्या कार्निव्हलमधील विशेष नवीन आकर्षण म्हणजे लाईट अटेलियर – हे निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आणि कतारमधील दादू – चिल्ड्रन्स म्युझियम यांच्या सहकार्याने सादर करण्यात आले आहे. यावेळी ४ ते १२ वयोगटातील मुलांसाठी प्रत्यक्ष सहभागातून प्रकाश, सावली आणि रंग यांची जादू शोधण्याची संधी देणारा आकर्षक उपक्रम राबवण्यात आला.

रिलायन्स फाउंडेशनचा ESA कार्यक्रम अशा प्रकारच्या शैक्षणिक संधी सर्व पार्श्वभूमीतील मुलांसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न करतो, जो रिलायन्सच्या ‘We Care’ या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमाचा उद्देश विविध समुदायांतील मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि आकांक्षांना चालना देणारे अनुभव देणे, तसेच आनंद आणि देणगीच्या भावनेचा उत्सव साजरा करणे हा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >