मोहित सोमण: विद्या वायर्स लिमिटेडने आज आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर सप्टेंबर महिन्यात निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या ३६.३२ कोटींच्या तुलनेत ३८.०९ कोटींवर वाढ झाली आहे. तसेच कंपनीच्या इतर उत्पन्नातही इयर ऑन इयर बेसिसवर सप्टेंबर तिमाहीत ६.५५ कोटीवरून २६.२८ कोटींवर वाढ झाली आहे. दरम्यान कंपनीच्या खर्चात मात्र सप्टेंबरपर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर ३५.३१ कोटीवरून ३६.९१ कोटीवर वाढ झाली आहे. निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या करपूर्व नफ्यात (PBT) इयर ऑन इयर बेसिसवर १०.७ कोटीवरून १४.४४ कोटीवर वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ८ कोटीवरुन १० कोटींवर वाढ झाल्याचे दिसून आले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तिमाही निकालानंतर ईपीएस (Earning per equity share EPS) ०.५१ रुपये प्रति शेअरवरून ०.६५ रूपये प्रति शेअरवर वाढले आहेत. निकालानंतर कंपनीचा शेअर ०.४२% वाढत ५२.६६ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. आज दिवसभरात कंपनीचा शेअर २% पातळीवर उच्चांकावर पोहोचला होता सर्वाधिक पातळी शेअरने ५४.९० रुपयांची नोंदवली आहे. शेअर १० डिसेंबरला बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) झाला होता. गेल्या दोन आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये मूळ प्राईज बँड निश्चित केलेल्या ५२ रुपयांच्या तुलनेत पुन्हा ५२ रुपयांवर व्यवहार करत आहे.
नुकत्याच आलेल्या कंपनीच्या ३००.०१ कोटींच्या आयपीओला एकूण २८.५३ कोटीचे सबस्क्रिप्शन मिळाले होते. कंपनीच्या पब्लिक इशूला रिटेल गुंतवणूकदारांकडून २९.९८ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५.४५ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५५.९४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. निकालातपूर्वी सकाळच्या सत्रात शेअर २.९९% पातळीवर उसळला होता. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ११४४.०७ कोटी रुपये आहे.
कंपनी वायरिंग संबंधित उत्पादने तयार करते ज्यामध्ये कंपनीतचे उत्पादन असलेल्या वायर ऊर्जा निर्मिती,इलेक्ट्रिक मोटर्स, स्वच्छ ऊर्जा प्रणाली (Clean Energy System), विद्युत प्रणाली इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि रेल्वे यांसारख्या विविध महत्त्वाच्या उपयोगांमध्ये वापरल्या जातात. इनॅमल्ड तांब्याच्या आयताकृती पट्ट्या,अचूकपणे डिझाइन केलेल्या इनॅमल्ड तारा, विशेष वाइंडिंग तारा, पीव्ही रिबन, अँल्युमिनियम पेपर-कव्हर केलेल्या पट्ट्या आणि पेपर-इन्सुलेटेड तांब्याच्या वाहकांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर २५% अधिक महसूल मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ५९% वाढ झाली आहे. आयपीओनंतर एकूण ईपीएस २.५५ वरून २.२७ रूपये प्रति शेअरवर घसरला होता. कंपनीचे मार्च महिन्यापर्यंत पीएटी मार्जिन (Profit after tax margin) २.७४% होते तर ईबीटा (EBITDA) म्हणजेच करपूर्व कमाईवरील मार्जिन २.७४% होते. श्यामसुंदर राठी, शैलेश राठी, शिल्पा राठी हे कंपनीचे प्रवर्तक (Promoters) आहेत.आतापर्यंत दोन आठवड्यातील कंपनीच्या शेअरची निचांकी पातळी (All time Low) ४८.६५ रूपये आहे. तर ५२ आठवड्यातील सर्वाधिक पातळी ५८.४५ रूपये होती.






