Thursday, January 15, 2026

‘भारत टॅक्सी’मुळे प्रवास माफक आणि सुरक्षित

‘भारत टॅक्सी’मुळे प्रवास माफक आणि सुरक्षित

नवी दिल्ली : ओला आणि उबरसारख्या बड्या कंपन्यांना तगडी फाईट देण्यासाठी १ जानेवारी २०२६ पासून 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) हे नवीन ॲप लाँच होणार आहे. सहकारी मॉडेलवर आधारित असलेले हे ॲप प्रवासी आणि ड्रायव्हर्स या दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. प्रवाशांना 'पीक आवर्स'मध्ये वाढीव भाड्यापासून दिलासा मिळणार आहे, तर ड्रायव्हर्सना एकूण भाड्याचा ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला हे ॲप दिल्लीत लाँच केलं जाणार आहे.

सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंतर्गत ही सेवा चालवली जाईल. याला नाबार्ड, इफको आणि अमूल यांसारख्या मोठ्या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

या मॉडेलमध्ये टॅक्सी चालक हे केवळ कर्मचारी नसून ते या व्यवसायाचे मालक म्हणून काम करतील. सध्या दिल्ली आणि गुजरातमध्ये याची चाचणी सुरू असून ५१,००० हून अधिक चालकांनी नोंदणी पूर्ण केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >