Monday, December 22, 2025

सामान्य प्रशासन विभागाकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

सामान्य प्रशासन विभागाकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात ए. शैला, डॉ. कश्मीरा संखे आणि एम. अरुण या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वित्त विभागात सचिव पदी कार्यरत असलेल्या ए. शैला यांची नियोजन विभागात सचिव आणि विकास आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०२३ च्या बॅचच्या सनदी अधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे आयटीडीपीमध्ये प्रकल्प अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागीय कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे नाशिकच्या कळवान उपविभागीय कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर, २०२३ च्या बॅचचे सनदी अधिकारी एम. अरुण यांच्याकडेही आयटीडीपीमध्ये प्रकल्प अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे गडचिरोली उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment