Monday, December 22, 2025

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात दणक्यात वाढ,सेन्सेक्स ५०० व निफ्टी १५१ अंकाने उसळला

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात दणक्यात वाढ,सेन्सेक्स ५०० व निफ्टी १५१ अंकाने उसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात चांगली वाढ झाली आहे. शेअर बाजारातील ही वाढ प्रामुख्याने सकारात्मक बँक निर्देशांकासह मिडकॅप, आयटी, टेलिकॉम शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे झाली आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झाली असून बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला 'फिल गुड' वातावरण निर्मिती दिसत आहे. बाजारातील परिस्थिती मजबूत असताना नवा ट्रिगर नसला तरी मात्र जगभरातील स्थिरता व चीनच्या फेडरल बँकेने ठेवलेले स्थिर व्याजदर यामुळे बाजारात आज चांगली रॅली वॅगन्स आहे. सेन्सेक्स ५०० अंकाने व निफ्टी १५१ अंकाने उसळल्याचे सकाळी पहायला मिळत असून अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) १.७८ अंकांने उसळला असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदी विक्रीवर अखेरच्या सत्रातील गणिते अवलंबून असणार आहेत.

सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात ज्युपिटर वॅगन्स (९.६६%), जीई व्हर्नोवा (८.५०%),केसीबी (४.७९%), केईसी इंटरनॅशनल (३.८९%), फोर्स मोटर्स (३.७६%), सेल (३.१६%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (२.८२%), हिंदुस्थान कॉपर (२.८०%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक घसरण सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (५.५७%), रिलायन्स पॉवर (४.०५%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.७३%), चोलामंडलम फायनान्स (२.५४%), वोडाफोन आयडिया (२.०१%), इंटलेक्ट डिझाईन (१.६९%), साई लाईफ (१.५४%), टीबीओ टेक (१.५५%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment