Monday, December 22, 2025

शिवसेनेचा फटाके फोडून जल्लोष

शिवसेनेचा फटाके फोडून जल्लोष

तळा : तळा शहरात शिवसेना शिंदेगटाकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. दक्षिण रायगडमधील महाड व श्रीवर्धन नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याने तळा शहरातील बळीचा नाका व बसस्थानक परिसरात शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रवी मुंढे, तळा तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, कोअर कमिटी सदस्य लीलाधर खातू यांसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment