जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील बेकरसडल टाऊनशीपमध्ये बेछूट गोळीबार करण्याची घटना घडली. या गोळीबारात १० जण ठार झाले तर अन्य १० लोक जखमी झाले. या महिन्यातील दक्षिण आफ्रिकेतील ही दुसरी मास शुटिंगची घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्ग येथून नैऋत्य दिशेला ४० किमी अंतरावर असलेल्या बेकरसडल टाऊनशीपमध्ये रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, काही लोक रस्त्यावर उभे असताना त्यांच्यावर अज्ञात इसमाने अचानक गोळीबार केला. या महिन्यातील दक्षिण आफ्रिकेतील ही दुसरी मास शुटिंगची घटना आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्ग येथून नैऋत्य दिशेला ४० किमी अंतरावर असलेल्या बेकरसडल टाऊनशीपमध्ये रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, काही लोक रस्त्यावर उभे असताना त्यांच्यावर अज्ञात इसमाने अचानक गोळीबार केला.