Sunday, December 21, 2025

राज्यात मतमोजणी सुरू! कोकणापासून मराठवाड्यापर्यंत, जाणून विजयी नगसेवकांची यादी

राज्यात मतमोजणी सुरू! कोकणापासून मराठवाड्यापर्यंत, जाणून विजयी नगसेवकांची यादी

मुंबई: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी २८७ ठिकाणी मतमोजणी होत असून राज्यातील विविध विजयी नगसेवकांची यादी समोर आली आहे. दरम्यान जामनेर, अनगर आणि दोंडाई या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोण अव्वल राहणार याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे. त्याआधी जाणून घेऊया विजयी उमेदवारांची नाव:

वेंगुर्ले नगरपरिषद- 1. लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना 2. रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप 3. गौरी माईनकर, भाजप 4. प्रीतम सावंत, भाजप 5. विनायक गवंडकर, भाजप 6. गौरी मराठे, भाजप 7. आकांक्षा परब, भाजप 8. तातोबा पालयेकर, भाजप

सावंतवाडी नगरपरिषद- 1. दिपाली भालेकर, भाजप 2. तौकीर शेख, काँग्रेस 3. सुधीर आडीवरेकर, भाजप 4. दुलारी रांगणेकर, भाजप 5. आनंद नेवगी भाजप 6. सायली दुभाषी शिंदे सेना 7. देवेंद्र टेमकर उभाठा 8. सुनिता पेडणेकर भाजप 9. खेमराज कुडतरकर शिंदे सेना 10. मोहिनी मडगावकर भाजप

सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी-

सासवड नगरपरिषद-

प्रभाग ९, प्रभाग २ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २ मधील दिनेश भिंताडे ,लिना वढणे प्रभाग क्रमांक ९ मधील प्रदीप राऊत, प्रियंका जगताप भाजपचे विजयी उमेदवार आहेत.

चंदगड नगरपंचायत-

राजर्षी शाहू विकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी

तर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार ३ विजयी

जव्हार नगरपरिषद-

जव्हार नगरपरिषदेवर भाजपाची आघाडी दिसून येत आहे. नगरसेवकपदाचे भाजपाचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी.

रहिमतपूर नगरपरिषद-

प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ५ मध्ये ७ राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

३ भाजप उमेदवार विजयी

मुरगुड नगरपरिषद-

शिवसेनाचे १६ नगरसेवक विजयी

करमाळा-

करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयी

शिराळा नगरपंचायत-

भाजपा, शिवसेनेचे चार उमेदवार विजयी

मैंदर्गी नगरपरिषद-

भाजपचे ८ नगरसेवक तर स्थानिक गटाचे २ नगरसेवक विजयी

बार्शी नगरपरिषद-

भाजपाचे ५ नगरसेवक विजयी, तर शिउबाठाचे ३ नगरसेवक विजयी

औसा नगरपरिषद-

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा २३ जागांपैकी १७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय, ६ जागांवर भाजपाचा विजय,

आटपाडी नगरपंचायत-

भाजपा सहा जागा, शिवसेना सात जागा तर राष्ट्रवादी एका जागेवर विजयी

जेजुरी नगरपरिषद-

भाजपचे दोन उमेदवार विजयी, तर तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी

खेड नगरपरिषद-

२१ पैकी २१ जागांवर विजयी, ३ भाजपा आणि १८ शिवसेना

माधवी बुटाला शिवसेनेच्या नगराध्यक्ष विजयी

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा