Sunday, December 21, 2025

वेंगुर्ले नगरपरिषद भाजपकडे; तर सावंतवाडीतही कमळच

वेंगुर्ले नगरपरिषद भाजपकडे; तर सावंतवाडीतही कमळच

वेंगुर्ल्याच दिलीप उर्फ राजन गिरप नगराध्यक्षपदी विजयी; भाजप १५, उबाठा ४ व १ शिवसेना सावंतवाडीत भाजपच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले १३६४ मतांनी विजयी; ११ नगरसेवक विजयी

वेंगुर्ले: वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे दिलीप उर्फ राजन गिरप हे ४३१ मतांनी विजयी झाले आहेत. एकूण वीस नगरसेवक पदाच्या जागांपैकी १५ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला. तर शिवसेनेने एक जागा मिळवत वेंगुर्ल्यात खाते खोलले आहे. शिवाय शिउबाठाने ४ जागा जिंकल्या. दुसरीकडे सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय संपादित केला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत – भोंसले यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार ॲड. नीता कविटकर यांचा १३६४ मतांनी पराभव केला आहे. भारतीय जनता पार्टीचे एकूण ११ नगरसेवक विजयी झाले. तर शिवसेना ७ , काँग्रेस १ व उबाठा चा १ नगरसेवक विजयी झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >