महापालिका मुख्यालयाची दृष्टी सुधारणार; इमारतीत एआय आधारीत सीसी टिव्ही कॅमेरे बसवणार

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने मुख्यालय इमारतीत बसवण्यात आलेल्या सी सी टिव्ही कॅमेरे जुने झाले असून यातील कॅमेरे हे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे या कॅमेरांच्या माध्यमातून अचूक शोध घेता येत नसल्याने याठिकाणी नवीन तंत्रज्ञानावर आधारीत सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्यामुळे महापलिका मुख्यालयातील या जुन्या सी सी टिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून अंधूक झालेली दृष्टी आता अधिक सुधारुन स्पष्ट दिसू लागणार आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये सन २०१८मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या. या सी सी टिव्ही कॅमेरांच्या २ वर्षाच्या हमी कालावधीनंतर ३ वर्षाच्या देखभालीसह हे कंत्राट देण्यात आले होते. परंतु आता हे सर्व कॅमेरे जुने झाले असून कालबाह्य झाल्याने जुन्या इमारतीसह नवीन इमारतींमध्येही नव्याने सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.


यापूर्वी बसवण्यात आलेले कॅमेरे तत्कालिन तंत्रज्ञानावर आधारीत होते, परंतु आता एआय आधारीत कॅमेरे बसवण्यात येणार आहे. महापालिका यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने यासाठी निविदा मागवून अशाप्रकारचे कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सुरक्षा विभागाच्या मागणीनुसार नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे कॅमेरे बसवण्यात येणार आहे. यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नव्याने बसवण्यात येणारे कॅमेरे हे ए आय आधारीत असून ज्याद्वारे प्रगत प्रणालीमधून रिअल टाईम धोक्याचा शोध, चेहऱ्याची ओळख आणि स्वयंचलित सुचनांसह सुधारित देखरेख क्षमता वाढेल.




सीसीटीव्ही यंत्रणा सदैव सुसज्ज व सुरळीत कार्यरत राहील याची खात्री करणे अत्यावश्यक आहे, त्यादृष्टीकोनातून ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे मुख्यालयाच्या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्ती प्रतिबंधित करणे तसेच गुन्ह्यांचा तपास करणे शक्य होईल. मागील सी सी टिव्ही कॅमेरे बसवताना दोन वर्षांचा हमी कालावधी होता, परंतु आता नव्याने बसवण्यात येणाऱ्या कॅमेरांमध्ये एक वर्षांचा हमी कालावधी आणि त्यानंतर चार वर्षांची देखभाल अशाप्रकारचा समावेश आहे. यासाठी ४.२७ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम यांची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नरे पार्कच्या तुटलेल्या भिंती, पदपथांची होणार दुरुस्ती

मुख्य प्रवेशद्वारांसह होणार मैदानाची रंगरंगोटी मुंबई (विशेष प्रतिनिधी): परळमधील नरे पार्कचे मैदान या

निवडून येणाऱ्या जागांवरच भाजपाच्या इच्छुकांच्या उड्या

जिंकून येणाऱ्या जागांवर परस्पर होते घुसखोरी मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा

विक्रोळी ते भांडुप मध्ये सोमवारपासून ८७ तासांचा पाणीब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

BJP News : भाजपचा उबाठासह शरद पवारांना पुन्हा दणका! माजी आमदार सुरेश भोईर, संजोग वाघेरेंच्या हाती कमळ

शरद पवारांच्या आमदराचा मुलगा भाजपमध्ये दाखल मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच,

मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला ६ तासांत अटक

मालाड : मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

विक्रोळीत उबाठाचे खाते रिकामेच राहणार?

िचत्र पालिकेचे : विक्रोळी िवधानसभा सचिन धानजी मुंबई : विक्रोळी विधानसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून येत उबाठा