मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने मुख्यालय इमारतीत बसवण्यात आलेल्या सी सी टिव्ही कॅमेरे जुने झाले असून यातील कॅमेरे हे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे या कॅमेरांच्या माध्यमातून अचूक शोध घेता येत नसल्याने याठिकाणी नवीन तंत्रज्ञानावर आधारीत सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्यामुळे महापलिका मुख्यालयातील या जुन्या सी सी टिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून अंधूक झालेली दृष्टी आता अधिक सुधारुन स्पष्ट दिसू लागणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये सन २०१८मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या. या सी सी टिव्ही कॅमेरांच्या २ वर्षाच्या हमी कालावधीनंतर ३ वर्षाच्या देखभालीसह हे कंत्राट देण्यात आले होते. परंतु आता हे सर्व कॅमेरे जुने झाले असून कालबाह्य झाल्याने जुन्या इमारतीसह नवीन इमारतींमध्येही नव्याने सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी बसवण्यात आलेले कॅमेरे तत्कालिन तंत्रज्ञानावर आधारीत होते, परंतु आता एआय आधारीत कॅमेरे बसवण्यात येणार आहे. महापालिका यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने यासाठी निविदा मागवून अशाप्रकारचे कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सुरक्षा विभागाच्या मागणीनुसार नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे कॅमेरे बसवण्यात येणार आहे. यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नव्याने बसवण्यात येणारे कॅमेरे हे ए आय आधारीत असून ज्याद्वारे प्रगत प्रणालीमधून रिअल टाईम धोक्याचा शोध, चेहऱ्याची ओळख आणि स्वयंचलित सुचनांसह सुधारित देखरेख क्षमता वाढेल.
मुख्य प्रवेशद्वारांसह होणार मैदानाची रंगरंगोटी मुंबई (विशेष प्रतिनिधी): परळमधील नरे पार्कचे मैदान या परिसरातील मुलांना खेळासाठी एकमेव मैदान असून या ...





