मुख्य प्रवेशद्वारांसह होणार मैदानाची रंगरंगोटी
मुंबई (विशेष प्रतिनिधी): परळमधील नरे पार्कचे मैदान या परिसरातील मुलांना खेळासाठी एकमेव मैदान असून या मैदानातील सेवा सुविधा तसेच इतर प्रकारच्या कामांची दुरवस्था झाल्याने याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. परंतु आता या नरे पार्कमधील मैदानाच्या आतील तसेच बाहेरील बाजुची डागडुजी करून तेथील सेव सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात नरे पार्क मैदानातील असुविधा आता दूर होवून मुलांना चांगल्याप्रकारे खेळता येणार आहे. नरे पार्कसोबतच येथील फाळके मैदान आणि माटुंग्यातील हूपर उद्यानातील दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे.
परळ येथील दादासाहेब फाळके उद्यान, नरे पार्कमधील, संरक्षण भिंती तुटलेल्या आहेत, पदपथ खराब झालेल्या आहेत. गजेबो खराब झाले आहे, तसेच लहान मुलांची खेळणी आणि व्यायामाची साहित्येही तुटलेली आहेत. त्यामुळे यासर्वांची दुरुस्ती केली जाणार आहे. शिवाय मुख्य प्रवेश द्वार उभारले जाणार आहे. बैठक व्यवस्था अर्थात आसने तयार केली जाणार आहेत. याशिवाय येथील रंगरंगोटी, विद्युत दिव्यांसह इतर कामे आणि हिरवळ राखण्याच्यादृष्टीकोनातून कामे केली जाणार आहेत.
जिंकून येणाऱ्या जागांवर परस्पर होते घुसखोरी मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न भाजपा पाहत असले तरी आवश्यक ...
तसेच माटूंगा येथील प्रो. एम. व्ही. चंदगडकर उद्यान अर्थात हूपर उद्यानाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत संरक्षण भितीची दुरूस्ती केली जाईल, पदपथाचीही दुरुस्ती केली जाईल आणि रबर मॅटचीही दुरूस्ती केली जाईल, याशिवाय लहान मुलांच्या खेळाची साधने नव्याने बसविणे, रंगरंगोटी करणे, विद्युतीकरणासह हिरवळीची कामे केली जाणार आहेत. या तिन्ही उद्यान आणि मैदानांच्या डागडुजीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी एस बी एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.





