Sunday, December 21, 2025

नगराध्यक्षापदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी; आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवणात शिवसेनेचा जल्लोष

नगराध्यक्षापदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी; आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवणात शिवसेनेचा जल्लोष

हा जनतेचा विजय: आ. निलेश राणे

मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर या सुमारे हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. विरोधकांचा दारुण पराभव त्यांनी केला आहे. त्याबरोबरच शिवसेनेचे दहा नगरसेवकही विजयी झाले आहे. यामुळे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही. दरम्यान आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखे समोर जल्लोष करण्यात आला.

Comments
Add Comment