सातारा : शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकत्र आल्याने सातारा नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची दाणादाण उडाली. एकूण २५ प्रभागात ५० नगरसेवक पदांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनेलविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होता. शिवेंद्रराजे भोसले यांनी शहरभर मोठ्या ताकदीने प्रचार केला. तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सभा घेतली. राष्ट्रवादीच्या सभेत दोन्ही राजे निशाण्यावर होते. पण मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला.
मतदारांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना तब्बल ४२ हजार मतांच्या फरकाने विजयी केले. राष्ट्रवादीच्या सुवर्णादेवी पाटील यांना १५ हजार ५५६ मते मिळाली.
सातारा नगर परिषद निवडणुकीची सारी सूत्रे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडेच होती. प्रचाराचे नियोजन त्यांनीच केले. उदयनराजे आजारी असल्यामुळे यावेळी जास्त सक्रीय नव्हते. सगळी भिस्त शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरच होती. त्यांनी ही जबाबदारी व्यवस्थित हाताळली.
विजयी - अमोल मोहिते, भाजप मिळालेली मते - ५७ हजार ५९६
पराभूत उमेदवार- सुवर्णादेवी पाटील, राशप मिळालेली मते - १५ हजार ५५६
सातारा जिल्ह्यात भाजपचे नगराध्यक्षपदाचे सात उमेदवार विजयी
म्हसवड - पूजा विरकर
रहिमतपुर - वैशाली माने
वाई- अनिल सावंत
मेढा - रूपाली वाराघडे
मलकापुर - तेजस सोनवले
सातारा - अमोल मोहिते
फलटण - समशेरसिंह नाईक निंबाळकर
राष्ट्रवादी काँग्रेस - दोन नगराध्यक्ष
महाबळेश्वर - सुनील शिंदे
पाचगणी - दिलीप बगाडे






