Sunday, December 21, 2025

LIVE UPDATES : राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालात महायुतीचाच वरचष्मा

LIVE UPDATES : राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालात महायुतीचाच वरचष्मा
महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्याचे मतदान २ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० डिसेंबर रोजी झाले. आता मतमोजणी सुरू आहे. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  1. किती नगरपरिषदांमध्ये कोणाचे नगराध्यक्ष ? : भाजप १३४, शिवसेना ५१, राष्ट्रवादी काँग्रेस ३२, इतर ०, काँग्रेस २८, राशप ८, शिउबाठा ७

  2. किती नगरपालिकांमध्ये कोणाचे नगराध्यक्ष ? : भाजप ११४, शिवसेना ४२, राष्ट्रवादी काँग्रेस ४०, इतर ०, काँग्रेस २२, राशप २१, शिउबाठा १४

  3. कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक ? : भाजप २८४४, शिवसेना ५३७, राष्ट्रवादी काँग्रेस १८०, इतर ९२, काँग्रेस ९७, राशप १११, शिउबाठा १३९

  4. अलिबाग नगरपालिका निकाल : २० पैकी शेकाप - काँग्रेस - १७, शिउबाठा दोन आणि भाजप एका जागेवर

  5. पालघर नगरपरिषद : शिवसेना, डहाणू नगरपरिषद: शिवसेना, जव्हार नगरपरिषद : भाजपा, वाडा नगरपंचायत: भाजपा
  6. पालघर नगर परिषद... शिवसेना १९, भाजप ८, उबाठा ३
  7. डहाणूत भाजपचे राजपूत तेराशे मतांनी पिछाडीवर
  8. भाजपच्या पूजा उदावंत जव्हारच्या नव्या नगराध्यक्ष
  9. कणकवलीत भाजपचे दहा उमेदवार विजयी
  10. पालघर नगर परिषद १९५९७ मतांची मोजणी पूर्ण... शिंदे गट उमेदवार उत्तम घरत यांना ९२२७ ,भाजपचे कैलाश म्हात्रे ६३४२ मते मिळाली
  11. वाडा नगरपंचायत नगराध्यक्ष 2025च्या पदाची निवडणूक - पहिला राऊंड + दुसरी फेरी : निकिता गंधे, शिउबाठा - १७७३, रीमा गंधे भाजपा - ३१०७, हेमांगी पाटील शिवसेना - २१३२ । दुसऱ्या फेरीनंतर भाजपाच्या रिमा गंधे ९७५ मतांच्या आघाडीने
  12. पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उत्तम घरात आघाडीवर
  13. शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष उज्वला काळे सातव्यांदा निवडून आल्या
  14. पालघर शिंदे सेनेच्या घरात यांची १४०० मतांची आघाडी
  15. जवाहर नगरपरिषद भाजपच्या पूजा उदावंत ३५२ मतांनी आघाडीवर
  16. मालवणमध्ये शिवसेना आघाडीवर
  17. कणकवली - भाजपचे समीर नलावडे आघाडीवर. संदेश पारकर पिछाडीवर
  18. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा राजे भोसले विजयाच्या जवळ
  19. शिवसेनेचे तीन उमेदवार आघाडीवर
  20. बहुचर्चित मालवण नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक विजयी, सावंतवाडीत भाजप आघाडीवर
  21. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना धक्का. मनसेच्या कोमल जांगळी यांनी नगराध्यक्ष पदी मारली बाजी
  22. पूर्णामध्ये शिउबाठाला धक्का
  23. सांगोल्यात शहाजीबापूंचे उमेदवार आघाडीवर
  24. भगूरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
  25. साताऱ्यात अपक्ष आघाडीवर, दोन्ही राजे चिंतेत
  26. बारामतीत राष्ट्रवादीचीच हवा
  27. बीडमध्ये भाजप आघाडीवर
  28. उरण नगरपरिषद पहिला निकाल हाती, महाविकास आघाडी आघाडीवर
  29. मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासात नगराध्यक्ष पदाच्या १०३ जागांचे कल समोर आले आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक जागा भाजपने राखल्या आहेत. भाजप ५२, शिवसेना २२, राष्ट्रवादी १३ असे चित्र आहे. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला अद्याप दोन आकडी संख्या गाठता आलेली नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >