पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक रेल्वे मार्गांवर वंदे भारत धावत असून वेगवान प्रवासाला प्रवाशांकडून वेगवेगळ्या मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यापैकी पुणे- नागपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेमध्ये रेल्वेकडून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास कमी वेळेमध्ये अधिकच सुपरफास्ट होणार आहे.
पुणे- नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून दमदार प्रतिसाद मिळत असल्यामुळे रेल्वेकडून या एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या सोयींमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे- अजनी वंदे भारत एक्स्प्रेसच्या सार्वजनिक वेळेमध्ये अंशतः सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुसाट आणि कमी वेळात होणार आहे.
मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने मुख्यालय इमारतीत बसवण्यात आलेल्या सी सी टिव्ही कॅमेरे जुने झाले असून यातील कॅमेरे हे बंद स्थितीत आहेत. ...
हा बदल दिनांक २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. गाडी क्रमांक २६१०१ पुणे ते अजनी वंदे भारत एक्सप्रेस अकोला स्थानकावर सुधारित आगमन वेळ १४.४० आणि सुटण्याची वेळ १४.४२ असेल. बडनेरा रेल्वेस्थानक सुधारित आगमन वेळ १५.४८ आणि सुटण्याची वेळ १५.५० असेल. सुधारित वेळापत्रकानुसार, ही ट्रेन अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकांवर सुमारे १० मिनिटे लवकर पोहोचेल आणि निघेल. शिवाय, वर्धा स्थानकावरही वेळेच्या आधी पोहचेल.
पुणे- अजनी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस अजनी आणि पुणे दरम्यान धावते. सुधारित वेळापत्रकानुसार, अकोला, बडनेरा आणि वर्धा स्थानकांवर या ट्रेनची येण्याची आणि सुटण्याची वेळ लवकर असणार आहे, ज्यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळेत बचत होईल.






