मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचा काल (२० डिसेंबर) मुंबईत अपघात झाला. नोरा डेव्हिड गुएटा यांच्या कॉन्सर्टसाठी सनबर्न फेस्टिव्हलकडे जात होती. तेव्हा एका मद्यधुंद कारचालकाने नोराच्या कारला धडक दिली, ज्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातानंतर नोराच्या टीमने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. नोराचे सीटी स्कॅन करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर रॅश ड्रायव्हिंग आणि मद्यपान करून वाहन चालवणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या अपघातातून उपचार घेतल्यानंतर नोरा फतेहीने दिलेला शब्द पाळत 'सनबर्न फेस्टिव्हल'मध्ये उपस्थिती दर्शवली. तिने ठरल्याप्रमाणे स्टेजवर सादरीकरणही केले. त्यामुळे नेटकरी तिचे कामाप्रती असलेल्या प्रेमाचे कौतुक करत आहेत.
पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक रेल्वे मार्गांवर वंदे भारत धावत असून ...
दरम्यान नोरा फतेहीला अपघातानंतर रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी काही अंतर्गत दुखापत झाली आहे का हे तपासण्यासाठी सीटी स्कॅन केला. सीटी स्कॅननंतर डॉक्टरांनी सांगितले की तिला गंभीर दुखापत झालेली नाही. त्यामुळे अभिनेत्रीने आपल्या ठरलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.






