Sunday, December 21, 2025

जिल्ह्यात ३१ ठिकाणी ‘५ जी’ मोबाईल टॉवर

जिल्ह्यात ३१ ठिकाणी  ‘५ जी’ मोबाईल टॉवर

कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)कडून या मंजुरीची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

यात देवगड तालुक्यातील हिंडळे, कुणकवन, महाळुंगे,मोंड, फणसगाव, पोयरे, तळवडे, तांबडेग, तिरलोट-दाभोळे कातकरवाडी, विठ्ठलादेवी, वेळगिवे अशी गावे देवगड तालुक्यातील आहेत, तर दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावात टॉवर मंजूर झाला आहे. कणकवली तालुक्यात ओटव फोटो घात टॉवर मंजूर झालेला आहे. कुडाळ तालुक्यात कालेली,कुसगाव या गावांसाठी टॉवर मंजूर झालेले आहेत. मालवण तालुक्यात बागवाडी, धामापूर, निरोम, राठिवडे, सावंतवाडी तालुक्यात पडवे, माजगाव, सातोळी तर्फ सातार्डा, तांबोळी या गावांना टॉवर मंजूर झालेले आहेत, तर वैभववाडी तालुक्यात भोम, जांभवडे, मौंदे, नाणिवडे, तिरवडे तर्फ खारेपाटण, तिरवाडे तर्फ सोंदळ या ठिकाणी टॉवर मंजूर झालेले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात साखेलेखोल, टांक असे बीएसएनएलचे टॉवर मंजूर झालेले आहेत.

Comments
Add Comment