Saturday, December 20, 2025

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे. उपकर्णधार विहान मल्होत्रा आणि ॲरॉन जॉर्ज यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने १९ वर्षाखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंतिम फेरीत धडक मारली. आता महाअंतिम सामना रविवार भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. दुबईतील आयसीसी अकादमी मैदानात होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.टीम इंडियाने गेल्या 4 वर्षांपासून ही ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे पाकिस्तानला हरवून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. काही दिवसांपूर्वीच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. आता भारताचा ज्युनियर संघही त्याच मार्गावर असून, पाकिस्तानला धूळ चारून आशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय युवा संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये कर्णधार आणि सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली आहे, तर गोलंदाजीमध्ये फिरकी आणि वेगवान माऱ्याच्या जोरावर भारताने प्रतिस्पर्ध्यांना रोखले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघही फॉर्मात असून आजचा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

अंतिम सामन्याची माहिती : सामना: भारत विरुद्ध पाकिस्तान तारीख: २१ डिसेंबर २०२५ (रविवार) ठिकाण: आयसीसी अकादमी मैदान, दुबई.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा