मुंबई महापालिका स्वबळावर लढणार
मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली असून, थेट उबाठा गटाला आव्हान दिले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. “आम्ही भाजप आणि उबाठाविरोधात निवडणूक लढवणार आहोत”, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या या निर्णयामुळे मविआतील समीकरणे मात्र पूर्णपणे बदलली आहेत.
रमेश चेन्निथला सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “काँग्रेस मुंबई महापालिकेच्या २२७ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करेल. आम्ही भाजप आणि उबाठा गटाविरोधात लढणार आहोत. सच्चे देशभक्त, धर्मनिरपेक्ष आणि मुंबईच्या विकासासाठी समर्पित असलेल्या लोकांनी आमच्यासोबत यावे. सत्ता आमच्याकडे आल्यानंतर मुंबईचा कारभार पारदर्शी आणि जनमुखी पद्धतीने चालवू. याबाबतचा सविस्तर जाहीरनामा लवकरच मतदारांसमोर सादर करू", असे त्यांनी सांगितले.
सगळीकडे भगवाधारी महापौर दिसणार : मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : निवडणुकीच्या निकालांनंतर राजकीय वातावरण तापले असून, भाजप आमदार आणि पालकमंत्री नितेश ...
पालिकेच्या कारभारावर टीका
चेन्निथला यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका कली. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून निवडणुका न झाल्याने प्रशासकीय हस्तक्षेप वाढला असून, मुंबईकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले गेले आहे. वाढते प्रदूषण, रुग्णालयांची दयनीय अवस्था, आरोग्य सुविधांची कमतरता, रस्त्यांची खराब स्थिती आणि सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार यामुळे सामान्य मुंबईकर, विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत नागरिकांना पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.






