Saturday, December 20, 2025

Silver Rate Today: चांदी २१५००० जवळ पोहोचली ५२ आठवड्यातील सर्वाधिक 'वादळी' वाढ 'या' कारणांमुळे

Silver Rate Today: चांदी २१५००० जवळ पोहोचली ५२ आठवड्यातील सर्वाधिक 'वादळी' वाढ 'या' कारणांमुळे

मोहित सोमण:आज चांदीच्या दरात वादळी वाढ झाली आहे. चांदी जागतिक स्तरावर वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर (All time High) पातळीवर पोहोचली आहे. भारतीय बाजारापेक्षा जागतिक अस्थिरतेचा फटका गेल्या दोन आठवड्यात चांदीत कायम राहिला असला तरी आज भावनिक कारणासह तांत्रिक कारणामुळे चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ५ रुपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात ५००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २१४ रूपयांवर पोहोचले असून प्रति किलो दर २१४००० रूपयांवर म्हणजेच जवळपास २१५००० पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २१४० रूपये, प्रति किलो दर २१४००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) चांदीचा निर्देशांक ०.२१% घसरल्याने चांदी २०८०००० पातळीवर चांदी पोहोचली आहे.

गेल्या आठवड्यात चांदी निव्वळ (Net) प्रमाणात पाहिल्यास १२ हजार रूपये प्रति किलो वाढली आहे. संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास चांदी इयर टू डेट (YTD) पातळीवर १३०% वाढ झाली आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर चांदीच्या दरात अस्थिरता अधिक प्रमाणात वाढली कारण डॉलर निर्देशांकात झालेल्या वाढीचा दबाव कमोडिटीत वाढल्याने सोन्याचांदीच्या मागणीत आणखी वाढ अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर झाली.

जागतिक स्तरावर चांदीचा सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ३.४८% इतकी तुफानी वाढ झाली आहे. त्यामुळे निर्देशांक ६७.४७ प्रति डॉलरवर पोहोचला. युएस बाजारात काल झालेल्या मोठ्या नफा बुकिंग (Profit Booking) फायदा बाजाराला झाला आहे. युएस गुंतवणूकदारांनी कालच्या अनपेक्षित ग्राहक किंमत निर्देशांकात म्हणजेच महागाईत घसरणीमुळे बाजारातील दरकपातीतील भावना उफाळून आल्या होत्या. मजबूत फंडामेंटलसह चांदीच्या तुटवड्यामुळे चांदीत आज मोठी वाढ झाली आहे. काल अस्थिरतेतही चांदीत घसरण झाल्याने युएस गुंतवणूकदारांनी काल नफा बुकिंग मोठ्या प्रमाणात केली आहे. परिणामी बाजारातील चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांदी आज उसळली.

गेल्या वर्षभरात मजबूत ईटीएफ गुंतवणुकीत सातत्यपूर्ण किरकोळ खरेदीत (Retail Purchase) वाढ झाली. अमेरिकेने चांदीला महत्वपूर्ण धातूच्या यादीत स्थान दिल्याने मोठ्या प्रमाणात चांदीच्या गुंतवणूकीत बाजारात हेजिंग सुरु आहे. चांदीच्या औद्योगिक मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने तज्ञांच्या मते, पुरवठ्याच्या सततच्या तुटवड्याच्या अपेक्षांना आणखी बळकटी मिळाली. औद्योगिक मागणीत विशेषतः सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स आणि डेटासेंटर,पायाभूत सुविधा यामध्ये चांदीला विशेष महत्व प्राप्त झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >