Saturday, December 20, 2025

शनिवार एक्सप्लेनर-अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह फंड गुंतवणूकीत नेमका फरक काय? तुम्हाला कुठला सोयीस्कर प्रश्न पडलाय? मग वाचा

शनिवार एक्सप्लेनर-अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह फंड गुंतवणूकीत नेमका फरक काय? तुम्हाला कुठला सोयीस्कर प्रश्न पडलाय? मग वाचा

मोहित सोमण

म्युच्युअल फंड गुंतवणुक करताना अ‍ॅक्टिव्ह फंडात करू का पॅसिव्ह फंडात करू अशी द्विधा मनस्थिती तुमची झाली असेल तर नक्की करू असे वाटल्यास ते सहाजिकच आहे. दोन्ही योजना वेगळ्या आहेत त्यांचे फायदे तोटे वेगळे आहेत. उद्दिष्ट वेगळी आहे संकल्पना वेगळी आहे काय दोन्ही योजनेतील फरक जाणून घेऊयात -

Active Fund Vs Passive Fund

नक्की दोन्ही म्युच्युअल फंड गुंतवणूकीत फरक काय?

अ‍ॅक्टिव्ह फंड हा मानवी हस्तक्षेपासह बाजारात येतो. म्युच्युअल फंड गुंतवणूकीत पैसै टाकल्यावर दैनंदिन जीवनात या फंडाचे नियोजन फंड मॅनेजरकडून करण्यात येते. तज्ञ फंड मॅनेजर आपल्या ज्ञानाच्या आधारे कुठली गुंतवणूक वाढवावी अथवा काढावी यावर दैनंदिन जीवनात निर्णय घेतात. व आपले फंड व्यवस्थापन करतात. त्यातून होणारा नफा ( त्यांचा मोबदला वगळून) आपल्याशी शेअर केला जातो.

दरम्यान पॅसिव्ह फंड हा मानवी हस्तक्षेपासह येत नाही. हा इंडेक्स फंड अथवा विशेष निर्देशांकातील फंड असतो. या फंडात दैनंदिन उलाढाल होत नाही. फंड मॅनेजर यातील दैनंदिन आयुष्यात फंडांमध्ये लक्ष घालत नाही. तो आपले पैसे एखाद्या ठराविक निर्देशांकातील शेअर्समध्ये गुंतवतो. मग तो निफ्टी ५० असेल, नेक्स्ट ५० असेल, सेन्सेक्स ३०, मिड कॅप व स्मॉलकॅप असेल तो ठराविक निर्देशांकात पैशाची गुंतवणूक निश्चित करतो. त्यामुळे दैनंदिन कामकाजात या फंडात हस्तक्षेप केला जात नाही.

१) मुलभूत फरक- अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह फंडात मूलभूत फरक म्हणजे जोखीम आहे. अ‍ॅक्टिव्ह हा अधिक जोखीम असणारा म्युच्युअल फंड प्रकार असून पॅसिव्ह फंडात पर्यायाने कमी जोखीम (Risk) असते. अर्थात अ‍ॅक्टिव्ह फंडात जोखीम अधिक आहे. बाजारातील अस्थिरतेसह मानवी हस्तक्षेपाचेही परिणाम गुंतवणूकीतील परताव्यात होत असतात. फंड सांभाळत असलेल्या मॅनेजरच्या कौशल्यावर काही गोष्टी अथवा फायदा नुकसान अवलंबून असते. त्यात फंड गुंतवणूकीत मॅनेजर आपली रणनीती ठरवतो. ती गुंतवणूक मानवनिर्मित ठरते. दैनंदिन हस्तक्षेपामुळे व बाह्य वातावरणाचा एकत्रित परिणाम या गुंतवणूकीवर होतो त्यामुळे या गुंतवणूकीत जोखीमही अधिक असते. म्हणूनच जोखीम असली तरी यात गुंतवणूकदारांना परतावा (Returns) देखील अधिक मिळू शकतो दुसऱ्या पॅसिव्ह म्युच्युअल फंडात तसे होत नाही. तो मानवनिर्मित फंड नसल्याने त्यातील जोखीम कमी प्रमाणात असते. ती केवळ बाजारातील हालचालीवर, अंतर्बाह्य घटना, भूराजकीय घटना, अर्थव्यवस्थेतील हालचाली, क्षेत्रीय निर्देशांकात होणारा परिणाम अशा पद्धतीच्या हालचालीवर अवलंबून असते. त्यामुळे यामध्ये जोखीम कमी प्रमाणात असून ज्या शेअर्समध्ये पैसे टाकलेले आहेत त्या इंडेक्सप्रमाणे पैसे कमी जास्त प्रमाणात स्थिरावतात. अथवा त्यांची हालचाल अ‍ॅक्टिव्ह फंडपेक्षा संथ प्रमाणात होते. याशिवाय अ‍ॅक्टिव्ह फंडात जोखीम कमी असल्याने परतावाही अधिक प्रमाणात मिळू शकतो मात्र यात नुकसानही होण्याची शक्यता कायम असते. जर तो ईटीएफ गुंतवणूक प्रकार असेल तर बाकी सिस्टिम सारखी असते केवळ ईटीएफ बाजारात सूचीबद्ध असतात. म्हणजेच त्यांच्या किंमती बाजारातील किंमतीप्रमाणे सतत कमी जास्ती लाईव बदलत असतात.

२) तुमचे उद्दिष्ट- तुमचे उद्दिष्ट काळानुसार बदलत असेल अथवा पोर्टफोलिओने जलदगतीने बदलावे अशी इच्छा असल्यास आपल्यासाठी अ‍ॅक्टिव्ह फंड योग्य पर्याय राहणार आहे. तर स्थैर्याने आपली गुंतवणूक पुढे चालत रहावी असे वाटल्यास आपल्याला पॅसिव्ह फंड योग्य राहिल. पॅसिव्ह फंडात जरी लवकर रक्कम मिळत नसली तरी दीर्घकालीन गुंतवणूकीनंतर त्याचे फळ उशीरा चाखायला मिळते. पण सुरक्षित प्रमाणात परताव्यासह मिळू शकते. त्यामुळे तुमचे उद्दिष्ट तुम्हाला कामी येईल.

३) रिस्क टू रिवार्ड- रिस्क टू रिवार्ड हे अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंडात अधिक असते. तुम्ही जितकी मोठी रक्कमेची जोखीम घ्याल तितके मोठे नुकसान फायदा तोटा. व पण पॅसिव्ह फंडात तसे होत नाही. तो अस्थिरतेतही टिकून राहतो. या फंडाचा अंतरिम परिणाम झाला किंवा झाला नाही तरी दैनंदिन जीवनात पोर्टफोलिओत अवास्तव फरक पडत नाही. त्यामुळे जितकी मोठी रिस्क तितके मोठे रिवार्ड हे समीकरण या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

४)अल्फा व बीटा- अल्फा म्हणजे बाजारात जास्तीत जास्त फायदा किंबहुना बाजाराहून अधिक फायदा मिळवणे याला अल्फा स्ट्रॅटेजी म्हणतात. त्यामुळे यात पोर्टफोलिओतील खरेदी विक्रीत अधिक जोखीम घेऊन अधिकचे लेवरेज कमावले जाते. 'अल्फा' स्ट्रॅटेजी ही अ‍ॅक्टिव्ह फंडात वापरली जाते. तर 'बीटा' स्ट्रॅटेजी ही पॅसिव्ह म्युच्युअल फंडात वापरली जाते. बीटा ही संकल्पना दैनंदिन बाजारातील कामगिरीवर खेळली जाते. त्यामुळे जसा बाजाराचे प्रदर्शन असेल त्यानुसार तो परतावा कमी अधिक होतो. मात्र पोर्टफोलिओ खूप बदल होत नाही. पैसे काढताना त्यामुळे एक मर्यादेपर्यंत सुरक्षित परतावा मिळणे शक्य होते.

५) खर्च-अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर अधिक पैसा शुल्क म्हणून आकारतात. दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने त्यांचे वेतन, उत्पादन खर्च इतर खर्च यांचे प्रमाण अधिक असल्याने एक्सिट लोड या फंडात अधिक प्रमाणात आकारला जातो. त्यामुळे नफा जास्त असला तरी खर्चही अधिक असतो. दरम्यान पॅसिव्ह फंडात एक्सिट लोड किरकोळ अथवा खूप कमी असतो. त्यामुळे तुम्हाला उत्पादनाचा अधिक खर्च झेलावा लागत नाही. किरकोळ रकमेसह वजा करुन मुदतीनंतर तो फंड गुंतवणूकदारांना हाती मिळतो. सामान्यतः अ‍ॅक्टिव्ह फंडासाठी हा ०.०८ ते ०.२५% प्रत्येक डेट व इक्विटीवर अवलंबून असला तरी जास्तीत जास्त एक्सिट लोड पॅसिव्ह फंडात १% असू शकतो.

बाजारात तुमची गरज काय या गोष्टीवर या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकीत पैसे टाकणे हे अंतर्भूत आहे. खासकरून तुमचा पेशा काय? नोकरी व्यवसाय काय? तुमची आर्थिक गरज काय? तुमचे भविष्य काय? भविष्यातील गरज काय? या आधारे गुंतवणूक करताना या दोन्ही प्रकारात गुंतवणूक करताना विचार करावा.

त्यामुळेच यापैकी कोणता फंड अधिक चांगला किंवा सरस असे सांगता येत नाही. सक्रिय (Active) आणि निष्क्रिय (Passive) गुंतवणूक धोरणातील फरक तुमच्या निधीतील गरजेनुसार बदलत असतात. पॅसिव्ह ईटीएफ अथवा म्युच्युअल फंड थेट निर्देशांकाचे अनुकरण करतो व अ‍ॅक्टिव्ह व्यवस्थापित फंडात आर्थिकदृष्ट्या सक्षम सक्रिय फंड घेण्याची जोखमेची मानसिकता असलेला गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो.

त्यामुळे ही जोखीम व उद्दिष्ट्ये जुळत असतील तर सक्रिय फंडांचा विचार केला जाऊ शकतो. मात्र जर एखाद्या गुंतवणूकदाराला फंड व्यवस्थापकाने जास्त निर्णय घेऊ नयेत असे वाटत असेल व फंडाने केवळ बेंचमार्क निर्देशांकाचेच अनुकरण करावे असे गुंतवणूकदाराला वाटत असेल आणि जोखीम घ्यायची नसेल तर निष्क्रियपणे व्यवस्थापित (Passive Fund) फंडांचा विचार केला जाऊ शकतो. जर तुम्ही इंट्राडे व्यवहारांचे समर्थक असाल तर अ‍ॅक्टिव्ह फंड आपल्यासाठी चांगला आहे जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकीचे समर्थक असाल तर तुमच्यासाठी पॅसिव्ह म्हणजेच निष्क्रिय फंड चांगला आहे असे म्हणता येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >