Saturday, December 20, 2025

पनवेल पालिका भाजप निवडणूक प्रभारीपदी रामशेठ ठाकूर

पनवेल पालिका भाजप निवडणूक प्रभारीपदी रामशेठ ठाकूर

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवडणूक प्रभारीपदी तर आमदार महेश बालदी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देदीप्यमान विजय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश बालदी हे समीकरण कायम राहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पनवेल महापालिकेत भाजपच्या मोठ्या विजय होणार आहे.

आपल्या संघटन कौशल्याने भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या दोघांच्याही नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, पक्षाच्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. पक्षाने टाकलेला विश्वास प्रामाणिक मेहनत व नियोजनातून निश्चितच सार्थ ठरवू तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांच्या सहकार्याने ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्याचा संकल्प लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment