Saturday, December 20, 2025

राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात

राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात

अमरावती : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतले आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात झाला. अपघातात आमदार संजय खोडके जखमी झाला. अमरावतीच्या रीम्स रुग्णालयात आमदार संजय खोडकेंवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. 

आमदार संजय खोडके हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामासाठी शनिवार २० डिसेंबर रोजी अमरावती शहरात कार्यकर्त्यांच्या बैठकीला स्कूटवरुन जात होते. त्यावेळी समोरुन आलेल्या कारने खोडकेंच्या स्कूटरला धडक दिली. धडक जोरदार होती त्यामुळे स्कूटरवर बसलेले संजय खोडके काही अंतर दूर फेकले गेले आणि जखमी झाले. खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रिम्समध्ये दाखल केले आहे. अपघात प्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >