Saturday, December 20, 2025

मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला ६ तासांत अटक

मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला ६ तासांत अटक

मालाड : मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून पीडितेला बेशुद्ध केल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याच कृत्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करत असल्याचंही तपासात समोर आलं आहे.

ही घटना मालाड पूर्व परिसरात घडली असून या प्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अवघ्या सहा तासांत आरोपी महेश रमेश पवार (वय ४५) याला विरार येथून अटक केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपीने याच पद्धतीने यापूर्वीही अनेक अल्पवयीन मुलींना लक्ष्य केल्याचा संशय आहे. तो कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून मुलींना बेशुद्ध करत असे आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

अत्याचारानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितांना मानसिक दबावाखाली ठेवत होता, असं पोलिसांनी सांगितलं. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >