Friday, December 19, 2025

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेवर येत्या रविवारी २१ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ वी आणि ६वी मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल. या दरम्यान सिंहगड एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस,डेक्कन क्वीन,जनता एक्सप्रेस,काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,प्रगती एक्सप्रेस,सेवाग्राम एक्सप्रेस,चेन्नई–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल,हाटिया–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,कोयंबतूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –कोल्हापूर एक्सप्रेस,गोदान एक्सप्रेस,पवन एक्सप्रेस,नेत्रावती एक्सप्रेस, ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. वसई रोड – दिवा मेमू सकाळी ९.५० वाजता वसई रोड येथून सुटणारी मेमू गाडी कोपर येथे १०.३१ वाजता खंडित करण्यात येईल. दिवा–वसई रोड मेमू ही मेमू गाडी दिवा ऐवजी कोपर येथून ११.४५ वाजता सुटेल वसई रोड येथे १२.३० वाजता पोहोचेल. हार्बर मार्गावर हा ब्लॉक पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर (पोर्ट मार्ग वगळून) सकाळी ११.०५ ते संध्याकाळ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत असेल. या दरम्यान पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील १०.३३ ते दुपारी ३. ४९ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सकाळी ९.४५ ते दुपारी ३ . १२ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

कांदिवली-बोरिवली दरम्यान ३० दिवस पश्चिम रेल्वेचा ब्लॉक

कांदिवली-बोरिवली विभागातील सहाव्या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे ३० दिवसांचा ब्लॉक राबवणार आहे. हा ब्लॉक २० डिसेंबर २०२५ च्या रात्रीपासून सुरू होईल आणि १८ जानेवारी २०२६ पर्यंत चालेल. या कामात कांदिवली आणि बोरिवली स्थानकांवर ट्रॅक स्लीव्हिंग आणि अनेक क्रॉसओवर घालणे आणि काढून टाकणे समाविष्ट आहे. मोठे अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांचे काम आवश्यक असेल, ज्यामुळे रेल्वेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे परिणामी, काही उपनगरीय, प्रवासी आणि मेल व एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होईल. या कालावधीत पाचव्या मार्गावरील प्रवासी गाड्यांचे कामकाज स्थगित केले जाईल आणि इतर मार्गांवर वेगाचे निर्बंध लागू राहतील.

Comments
Add Comment