Saturday, December 20, 2025

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?
मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा आज (२० डिसेंबर) दुपारी १:३० वाजता केली जाणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निवड समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव संयुक्त पत्रकार परिषदेत १५ सदस्यीय भारतीय संघाची अधिकृत घोषणा करतील. विशेष म्हणजे, या बैठकीत केवळ वर्ल्ड कपच नाही, तर जानेवारीत होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठीही संघाची निवड केली जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारीपासून या मेगा इव्हेंटला सुरुवात होणार असून २० मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. गतविजेता भारतीय संघ 'ग्रुप-ए' मध्ये असून त्यांच्यासोबत पाकिस्तान, अमेरिका, नामीबिया आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. भारतीय संघ आपले साखळी सामने मुंबई (७ फेब्रुवारी), दिल्ली (१२ फेब्रुवारी), कोलंबो (१५ फेब्रुवारी) आणि अहमदाबाद (१८ फेब्रुवारी) अशा चार वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळणार आहे.

टी-२० वर्ल्ड कपसाठी संभाव्य १५ सदस्यीय भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.

एकदिवसीय (ODI) मालिका

११ जानेवारी: पहिला वनडे, वडोदरा १४ जानेवारी: दुसरा वनडे, राजकोट १८ जानेवारी: तिसरा वनडे, इंदूर टी-२० (T20I) मालिका २१ जानेवारी : पहिली टी-२०, नागपूर २३ जानेवारी : दुसरी टी-२०, रायपूर २५ जानेवारी : तिसरी टी-२०, गुवाहाटी २८ जानेवारी : चौथी टी-२०, विशाखापट्टणम ३१ जानेवारी : पाचवी टी-२०, तिरुवनंतपुरम

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ : साखळी सामन्यांचे वेळापत्रक

०७ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. पाकिस्तान vs नीदरलैंड्स. SSC, कोलंबो ०७ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. वेस्टइंडीज vs बांग्लादेश. कोलकाता ०७ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. भारत vs USA. मुंबई ०८ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. न्यूजीलैंड vs अफगानिस्तान. चेन्नई ०८ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. इंग्लैंड vs नेपाल. मुंबई ०८ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. श्रीलंका vs आयरलैंड. प्रेमदासा, कोलंबो ०८ फेब्रुवारी २०२६. ११: ००AM. बांग्लादेश vs इटली. कोलकाता ०८ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. जिम्बाब्वे vs ओमान. SSC. कोलंबो ०८ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. साउथ अफ्रीका vs कनाडा. अहमदाबाद १० फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. नीदरलैंड्स vs नामीबिया. दिल्ली १० फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. न्यूजीलैंड vs UAE. चेन्नई १० फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. पाकिस्तान vs USA. SSC. कोलंबो ११ फेब्रुवारी २०२६. ११: ००. साउथअफ्रीका vs अफगानिस्तान. अहमदाबाद ११ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. ऑस्ट्रेलिया vs आयरलैंड. प्रेमदासा. कोलंबो ११ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. इंग्लैंड vs वेस्टइंडीज. मुंबई १२ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. श्रीलंका vs ओमान. कैंडी १२ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. नेपाल vs इटली. मुंबई १२ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. भारत vs नामीबिया. दिल्ली १३ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. ऑस्ट्रेलिया vs जिम्बाब्वे. प्रेमदासा. कोलंबो १३ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. कनाडा vs UAE. दिल्ली १३ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. USA vs नीदरलैंड्स. चेन्नई १४ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. आयरलैंड vs ओमान. SSC, कोलंबो १४ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. इंग्लैंड vs बांग्लादेश. कोलकाता १४ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. न्यूजीलैंड vs साउथ अफ्रीका. अहमदाबाद १५ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. वेस्टइंडीज vs नेपाल. मुंबई १५ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. USA vs नामीबिया. चेन्नई १५ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. भारत vs पाकिस्तान. प्रेमदासा, कोलंबो १६फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. अफगानिस्तान vs UAE. दिल्ली १६फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. इंग्लैंड vs इटली. कोलकाता १६फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. ऑस्ट्रेलिया vs श्रीलंका. कैंडी १७ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. न्यूजीलैंड vs कनाडा. चेन्नई १७ फेब्रुवारी २०२६ . ३:०० PM. आयरलैंड vs जिम्बाब्वे. कैंडी १७ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. बांग्लादेश vs नेपाल. मुंबई १८ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. साउथ अफ्रीका vs UAE. दिल्ली १८ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. पाकिस्तान vs नामीबिया. SSC, कोलंबो १८ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. भारत vs नीदरलैंड्स. अहमदाबाद १९ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. वेस्टइंडीज vs इटली. कोलकाता 1१९ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. श्रीलंका vs जिम्बाब्वे. प्रेमदासा, कोलंबो १९ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. अफगानिस्तान vs कनाडा. चेन्नई २० फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. ऑस्ट्रेलिया vs ओमान. कैंडी २० फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. ऑस्ट्रेलिया vs ओमान. कैंडी

साखळी सामने संपल्यानंतर सुपर ८, उपांत्य फेरी आणि २० मार्च २०२६ रोजी महाअंतिम सामना खेळवला जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा