मोहित सोमण: गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड (GDGIL) या भारतातील डिजिटल इन्शुरन्स सेवा कंपनीत तिच्याच होल्डिंग कंपनी असलेल्या गो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (GDISPL) कंपनीचे मुख्य कंपनी जीडीजीआयएल (GDGIL) मध्येच विलिनीकरण (Amalgamation) करणार असल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने (Board of Diretors) हा प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे ती आता प्रलंबित मंजूरी प्रचलित वैधानिक, नियामक, भागधारक आणि तृतीय पक्षांच्या (Third Party) मंजुरींच्या अधीन असेल असेही कंपनीने आपल्या घोषणेत म्हटले आहे.प्रस्तावित विलीनीकरण लागू कायद्यानुसार विलीनीकरणाच्या योजनेद्वारे (Scheme of Amalgamation) केले जाईल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भागधारक (Stakeholders), कर्जदार (Lenders),नियामक (Regulators),वैधानिक अधिकारी (Complaince Officer) आणि माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (National Company Law Tribunal NCLT) अधिकार क्षेत्रातील खंडपीठाच्या आवश्यकतेनुसार मंजुरींच्या अधीन असेल असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले. कंपनीने प्रस्तावित विलीनीकरण निर्णयामागे आपली कंपनी वृद्धिंगत करण्यासाठी आपली वचनबद्धता असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले. मालकीची रचना सुलभ करून भागधारक आणि कार्यरत व्यवसायात थेट समन्वय साधून मूल्य वाढवणे, अधिक सुलभ आणि कार्यक्षम कॉर्पोरेट रचना निर्माण करणे (Corporate Restructuring)आणि कंपनीचा विस्तार करणे ही आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या (GDGIL) प्रशासन, व्यवस्थापन किंवा कार्यप्रणालीमध्ये कोणताही बदल होणार नाही. प्रवर्तक (Promoter) पूर्वीप्रमाणेच कायम राहतील फक्त जीडीआयएसपीएल (GDISPL) वगळता कंपनीचे प्रमुख कंपनी जीडीजीआयएल (GDGIL) मध्ये विलीनीकरण होईल. कंपनीच्या दाव्यानुसार, संचालक मंडळाची रचना अपरिवर्तित राहील आणि सध्याची नेतृत्व टीम धोरण राहिल.
याखेरीज विलीनीकरणानंतर, जीडीआयएसपीएल (GDISPL) च्या भागधारकांना योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शेअर विनिमय गुणोत्तरानुसार मुख्य कंपनीचे इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. विलीनीकरणापूर्वी आणि नंतरची संपूर्ण जीडीजीआयएल (GDGIL) कंपनीची नवी भागभांडवल रचना तयार होणार आहे. त्यामुळे प्रवर्तकांचे भागभांडवल ७२.१७% वरून ७२.२०% पर्यंत किंचित वाढणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जीडीजीआयएलचे अतिरिक्त शेअर्स प्रति शेअर ३७५.१० रूपये प्रति शेअर किमतीवर इशू केले जातील असे कंपनीने स्पष्ट केले.






