Saturday, December 20, 2025

विक्रोळी ते भांडुप मध्ये सोमवारपासून ८७ तासांचा पाणीब्लॉक

विक्रोळी ते भांडुप मध्ये  सोमवारपासून ८७ तासांचा पाणीब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद – जोडणी (क्रॉस – कनेक्शन) चे काम मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीनंतर १ वाजेपर्यंत (एकूण ८७ तास) सुरु राहणार आहे. परिणामी, पूर्व उपनगरातील भांडुप, विक्रोळी या महापालिकेच्या एस विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्‍या वेळेतही बदल होणार आहे.

एस विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

भांडुप, विक्रोळी भागात असा होणार पाणी पुरवठ्यावर परिणाम

  1. भांडुप पश्चिम, क्वारी मार्ग, टेंभी पाडा, कोकण नगर, समर्थ नगर, भट्टी पाडा, उत्कर्ष नगर, श्रीरामपाडा, त्रिमूर्ती नगर, वाघोबावाडी , तानाजीवाडी, राम नगर, शिवाजी नगर
  2. खिंडीपाडा
  3. विक्रोळी पश्चिम
  4. साई हिल, साकी विहार पंपिंग सप्लाय
  5. रमाबाई नगर पंपिंग सप्लाय
  6. हनुमान नगर, फुले नगर पंपिंग सप्लाय
Comments
Add Comment