Wednesday, January 28, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ कारखान्यांकडून ३७ लाख ३७ हजार मे. टनाचे गाळप

अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ कारखान्यांकडून  ३७ लाख ३७ हजार मे. टनाचे गाळप
कोपरगांव : अहिल्यानगर जिल्हयात ११ सहकारी व २ खाजगी अशा १३ साखर कारखान्यांनी १८ डिसेंबर पर्यंत ३७ लाख ३७ हजार ३२७ मे. टन ऊसाचे गाळप करून त्यापासुन २८ लाख २९ हजार २८५ साखर पोत्यांची निर्मीती केली आहे तर सरासरी गाळप ऊतारा ९.२८ टक्के मिळाला आहे. जिल्हयात सर्वाधिक गाळप अंबालिका कारखान्याने करून आघाडी घेतली आहे. जिल्हयातील साखर कारखाने त्यांचे ऊस गाळप मे. टनात, तयार झालेले एकुण साखर पोते व दैनंदिन गाळप ऊतारा टक्के याबाबतची आकडेवारी कंसात पुढीलप्रमाणे दर्शविली आहे. अंबालिका (६ लाख ७६ हजार २१० मे. टन गाळप), ४ लाख ५१ हजार २०० साखर पोते), (७.०८ टक्के सरासरी गाळप ऊतारा), ज्ञानेश्वर (४ लाख १२ हजार ८५०) (३ लाख ४३ हजार ६००) (९.७६), गंगामाई (३ लाख ८१ हजार ९८०) (१ लाख ९५ हजार ३००) (९.७६), मुळा (३ लाख ९२ हजार १३०) (२ लाख ८७ हजार ५००) (९.७१), पद्मश्री विखे पाटील (३ लाख ४८ हजार ५५०) (२ लाख २८ हजार ६५०) (९.८६), कर्मवीर काळे (२ लाख ५४ हजार ६२६) (२ लाख ४९ हजार २००), अशोक १ लाख ७१ हजार ७९०, सहकारमहर्षी कोल्हे (१ लाख ६७ हजार ५३३) (१ लाख १३ हजार ८५०), संगमनेर (३ लाख १८ हजार ७७०) (२ लाख ६८ हजार ४६०) याप्रमाणे गळीत झाले आहे.
Comments
Add Comment