आमिर खान प्रोडक्शन्सने आपली नवी जासूसी कॉमेडी ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ अतिशय मजेशीर आणि हटके अंदाजात जाहीर केली असून, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता लगेचच वाढली आहे. वीर दास दिग्दर्शित आणि त्यांच्यासोबत मोना सिंह महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची घोषणा स्वतः मध्येच एक फन पॅकेज होती, ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली. आता जेव्हा उत्साह शेगेला पोहोचला आहे, तेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, तो प्रचंड हास्य, धमाल आणि मनोरंजनाचे वचन देतो.
हॅपी पटेल: खतरनाक जासूसचा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून मनोरंजनाला अगदी नव्या पातळीवर नेतो. ट्रेलरमध्ये जबरदस्त विनोद आणि अनेक मजेशीर, हटके क्षण पाहायला मिळतात, ज्यावरून हा चित्रपट पूर्णपणे एंटरटेनमेंटने भरलेला असेल हे स्पष्ट होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत वीर दास आपली वेगळी आणि फ्रेश कॉमेडी स्टाइल घेऊन आले आहेत, जी प्रेक्षकांना खळखळून हसवते. ऊर्जा, चार्म आणि यंग वाइबने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतो.
हॅपी पटेल: खतरनाक जासूसच्या ट्रेलरमध्ये वीर दास एका अगदी नव्या अंदाजात दिसतात—एक परफेक्ट पण थोडासा इम्परफेक्ट जासूस, जो एका मिशनवर निघतो. कथा पुढे जात असताना तो अडचणीत सापडतो आणि मग सुरू होतो पूर्ण गोंधळ, जो पाहायला खूपच मजेदार आहे. मोना सिंह आपल्या रॉ आणि दमदार अवताराने चकित करतात—त्यांना याआधी कधीच अशा रूपात पाहिलेलं नाही. मिथिला पालकर आपल्या खास निरागसपणाने आणि चार्मने वेगळीच रंगत आणते. आमिर खानचा पूर्णपणे वेगळा आणि अनोखा लूक कथेला आणखी एक जबरदस्त तडका देतो. एकूणच, हा ट्रेलर मस्ती आणि वेडेपणाने भरलेली फुल-ऑन रोलरकोस्टर राइड आहे.
View this post on Instagram
याशिवाय, आमिर खान प्रोडक्शन्सने नेहमीच हटके आणि वेगळ्या प्रकारच्या कथा प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. लगान, तारे जमीन पर, दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांनंतर, पुन्हा एकदा काहीतरी नवीन दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. यावेळी खास बाब म्हणजे प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन वीर दास यांच्यासोबतची ही भागीदारी. वीर दास यांनी आपल्या कॉमेडी स्पेशल्समधून जागतिक ओळख निर्माण केली असून, गो गोआ गॉन, बदमाश कंपनी आणि दिल्ली बेली यांसारख्या चित्रपटांतही काम केलं आहे. हॅपी पटेल हा आमिर खान प्रोडक्शन्ससोबत वीर दास यांचा दिल्ली बेली नंतरचा दुसरा चित्रपट आहे.
आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या हॅपी पटेलचे दिग्दर्शन वीर दास यांनी केलं आहे. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.






