आरक्षणामुळे वॉर्ड गेले, आता पुनर्वसन करायचे कुठे? पक्षापुढे पेच!
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये सर्वांधिक फटका काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसह चार नगरसेवकांचे वॉर्डच गायब झाले आहे. आता आरक्षित वॉर्डच न राहिल्याने भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे पुनर्वसन कुठे करावे हा प्रश्न आता भाजपा पुढे निर्माण झाला आहे . त्यामुळे विरोधी पक्षनेता रवी राजा, राजेंद्र नरवणकर, जगदीश अमिन कुट्टी तसेच श्वेता कोरगावकर यांना उमेदवारी कुठून द्यायची हाच मोठा प्रश्न आहे .
उबाठातील माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करु लागल्यांनतर भाजपाने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्वप्रथम मुंबई सेंट्रल येथील माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर, मरोळमधील जगदीश अमिन कुट्टी, अँटॉप हिलमधील नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते रवी राजा आणि आता बोरीवलीतील श्वेता कोरगावकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
यापैंकी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा प्रभाग क्रमांक १७६ हा ओबीसी महिला राखीव झाला आहे . परंतु शीव कोळीवाडा मतदार संघात आसपास एकही मतदार संघ सर्वसाधारण झालेला नाही. त्यामुळे रवी राजा यांचे पुनर्वसन कुठल्या प्रभागात करायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे रवी राजा यांना भाजपात धारावीत पाठवते का आणि शीव कोळीवाडा सोडून रवी राजा हे धारावीत जातील का असा प्रश्न उपस्थित आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ...
तर काँग्रेसचे राजेंद्र नरवणकर हे प्रभाग २१६ मधून निवडून आले होते. परंतु हा प्रभाग पूर्वी ओबीसी राखीव होता तर आता ओबीसी महिला राखीव झाला आहे. त्यामुळे राजेंद्र नरवणकर यांना दुसऱ्या वॉर्डाचा शोध घ्यावा लागणार आहे . त्यामुळे नरवणकर यांना बाजुचा खुला झालेल्या प्रभाग २१७ मध्ये संधी आहे. तसेच प्रभाग २१९ हा प्रभाग ओबीसी राखीव झाला आहे. त्यामुळे राजेंद्र नरवणकर यांचे मलबार हिलमधून पुनर्वसन करणे शक्य असले तरी मलबार हिलमध्ये त्यांचे पुनर्वसन होणार का,असा प्रश्न आहे. रवी राजा आणि राजेंद्र नरवणक यांचे दोघांचेही वॉर्ड गेल्याने त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही याची हमी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे त्यांचे पुनर्वसन कुठे होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे .
काँग्रेसचे प्रभाग क्रमांक ८२चे जगदीश अमिन कुट्टी यांचा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाल्याने ओबीसी महिला राखीव झाल्याने ते आपली पत्नी जगदीश्वरी कुट्टी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यास तयार आहेत. त्यामुळे अमीन कुट्टी यांना स्वत:ला निवडणूक लढवता येणार नसून ते आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात. तर काही दिवसांपूर्वी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ९मधील काँग्रेसच्या श्वेता कोरगावकर यांचा प्रभाग खुला झाला आहे. हा प्रभाग खुला झाल्याने श्वेता कोरगावकर यांना भाजपात प्रवेश दिला आहे. परंतु याप्रभागातून माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार हे शिवानंद शेट्टी आहे. तसेच शिवा शेट्टी यांची या प्रभागात उत्तम पकड आहे . त्यामुळे प्रभाग खुला आणि उमेदवार असताना भाजपाने श्वेता कोरगावकर यांना भाजपात प्रवेश का दिला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिवानंद शेट्टी असताना कोरगावकर यांना उमेदवारी कुठून देणार? कोरगावकर यांना उमेदवारी दिल्यास शिवानंद शेट्टी यांचे पुनर्वसन करणार कुठून ? त्यामुळे शिवानंद शेट्टी यांना प्रभाग ९मधून उमदेवारी दिल्यास कोरगावकर यांचे पुनर्वसन कुठे केले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे . मात्र, चार पैंकी केवळ एकाच उमेदवाराच्या पत्नीचा उमेदवारीचा मार्ग सुटला जात असून उर्वरीत नगरसेवकांच्या प्रभागांचा प्रश्न भाजपाचा कसा सोडवणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.






