Thursday, January 15, 2026

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी शनिवारी मतदान

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी शनिवारी मतदान

मुंबई : राज्यातील २३  नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी, तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १४३ सदस्यपदांच्या जागांसाठी (ता. २० ) मतदान होणार असून सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१  डिसेंबर २०२५  रोजी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८  नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार ०२  डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. सर्व संबंधित ठिकाणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >