मोहित सोमण:आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात वाढ अपेक्षित होती. गिफ्ट निफ्टीतील वाढीनंतर तसे संकेत मिळत होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारातील उसळत्या भावनेने आशियाई बाजारासह भारतीय बाजारात प्रभाव कायम राहिल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ४२३.८२ अंकाने उसळला असून निफ्टी १२८.२३ अंकांनी उसळला आहे. बँक निर्देशांकात अपेक्षित वाढ झाली नसली तरीही फार्मा, रिअल्टी, हेल्थकेअर, मिड स्मॉल हेल्थकेअर, पीएसयु बँक शेअर्समध्ये झालेल्या सर्वाधिक वाढीचा फायदा बाजारात दिसत आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात स्मॉलकॅप १०० (०.५६%), मिडकॅप १०० (०.५१%), स्मॉलकॅप ५० (०.६५%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे. अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) सकाळच्या सत्रात ०.२३% घसरल्याने बाजाराला सपोर्ट लेवल कायम दिसत आहे.
कारण काल युएस बाजारातील किरकोळ महागाईत अनपेक्षितपणे घसरण झाल्याचे दिसून आले आहे ज्यामुळे तज्ञांच्या मते २०२६ मधील सुरुवातीला फेड दर कपातीसाठी फेडरल बँकेला संधी मिळू शकेल. ग्राहक महागाई दर (Consumer Price Index) दरात इयर ऑन इयर बेसिसवर २.७% पातळीवर नोंदवली गेली आहे जी अपेक्षेपेक्षा कमी दराने पातळी वाढली. जपानमध्येही अनपेक्षितपणे महागाईत वाढ झाल्याने बँक ऑफ जपानने व्याजदरात मात्र २५ बेसिस पूर्णांकाने वाढ करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे १९९५ नंतर प्रथमच दर ०.७५% पातळीने वाढवला गेला असे आंतरराष्ट्रीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात मात्र कोर महागाईत जपानमध्ये घसरण झाल्याने धोरणाचा भाग म्हणून घेतलेल्या महागाई दर नियंत्रित करण्यासाठी बँकेच्या निर्णयाचे स्वागत आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांनी केल्याने आशियाई बाजारातही वाढ झाली आहे. दुसरीकडे भारतीय बाजारात रूपयांचे पुनरागमन झाल्याने वाढलेल्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकीचा फायदा, वाढलेल्या केअर ऐज अहवालातील सकारात्मक भावना या कारणामुळे भारतीय बाजारात आज वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.३६%) सह निकेयी २२५ (१.३८%), हेगसेंग (०.६४%), कोसपी (०.७१%) बाजारात सर्वाधिक वाढ झाली असून घसरण केवळ एकाच जकार्ता कंपोझिट (०.४७%) बाजारात झाली आहे. काल युएस बाजारातील महागाईतील सकारात्मक निरीक्षणानंतर युएस शेअर बाजार मोठ्या संख्येने उसळला. खासकरून कंज्यूमर ड्युरेबल्स, आयटी, एआय शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे तिन्ही बाजारात वाढ झाली ज्यामध्ये डाऊ जोन्स (०.७१%), एस अँड पी ५०० (०.९३%), नासडाक (१.३७%) बाजाराचा समावेश आहे. दरम्यान डॉलर निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाल्याने सोन्यात व रुपयांत काही प्रमाणात अस्थिरतेचे संकेत मिळत असले तरी आरबीआयच्या आक्रमक पद्धतीने डॉलर विक्रीतील काल ओपन मार्केट ऑपरेशन रूपया मोठ्या प्रमाणात नियंत्रित राहण्याचे संकेत मिळत आहेत.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ बीएलएस इंटरनॅशनल (८.७१%),आयटीआय (३.३५%), एबी रिअल इस्टेट (४.४८%,), युटीआय एएमसी (३.४१%), निवा बुपा हेल्थ (२.७९%),3M इंडिया (३.६६%), एससीआय (२.३१%), आदित्य एएमसी (१.९९%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण डॉ लाल पथलॅब्स (४९.८९%), एयु स्मॉल फायनान्स बँक (४.६२%), सफायर फूडस (२.०७%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (१.०८%), इंडिजेन (१.७६%), लीला पॅलेस हॉटेल (१.७३%), गोदावरी पॉवर (१.६५%), वरुण बेवरेज (१.४५%) समभागात झाली आहे.






