Friday, December 19, 2025

वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक? श्रीराम फायनान्समधील २०% हिस्सा एमयुएफजी खरेदी करणार

वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक? श्रीराम फायनान्समधील २०% हिस्सा एमयुएफजी खरेदी करणार

मोहित सोमण: देशातील सर्वात मोठ्या रिटेल फायनासिंग कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेड (Shriram Finance) कंपनीने आपल्या भागभांडवलापैकी (Stakeholding) ४.४ अब्ज डॉलर मूल्यांकन असलेला २०% हिस्सा जपानच्या एमयुएफजी (MUFG) कंपनीला विकण्याचे ठरवले आहे. याविषयी तयारी सुरू असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिले आहे. उपलब्ध माहितीनुसार, जपानची MUFG कंपनी श्रीराम फायनान्समध्ये ४.४ अब्ज डॉलर्समध्ये २० % हिस्सा खरेदी करणार आहे असे आज श्रीराम फायनान्सने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत शुक्रवारी सांगत वृत्ताची पुष्टी केली आहे. भारतातील विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) व वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक समजली जात आहे.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डीलॉजिकच्या आकडेवारीनुसार या क्षेत्रात या वर्षात आतापर्यंत जवळपास १५ अब्ज डॉलर्सचे सौदे झाले आहेत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये झालेल्या ६.५ अब्ज डॉलर्सच्या सौद्यांपेक्षा ही आकडेवारी दुप्पट आहे.

नोव्हेंबरमध्ये एमिरेट्स एनबीडी बँकेने भारतातील खाजगी बँक असलेली आरबीएल बँकेत ६०% हिश्शासाठी ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती जी त्यावेळी एका परदेशी बँकेने या क्षेत्रातील केलेली सर्वात मोठी गुंतवणूक होती. यासह आयडीएफसी फर्स्ट बँकेला वॉरबर्ग पिंकस आणि एडीआयए कडून ७५०० कोटी रुपये मिळाले होते. यानंतर लगेचच हा नवीन सौदा झाला आहे असेही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी म्हटले.

अनेक वर्षांपासून जपानच्या सर्वात मोठ्या बँका देशांतर्गत बाजारपेठेतील घट आणि अत्यंत कमी व्याजदरांमुळे परदेशातील व्यवसायिक संधी शोधत आहेत. त्यातून ही गुंतवणूक केली गेली असल्याचा तज्ञांचा कयास आहे. नुकत्याच बँक ऑफ जपानने वाढलेल्या महागाईमुळे व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत नवे लेवरेज घेण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल एमयुएफजीने उचलल्याचे सांगितले जाते. एमयुएफजी (Mitsubishi UFG Financial Group MUFG) ही कंपनी वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे. टोकियो जपान येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, अमेरिका, युरोप यासह कंपनीचे २००० पेक्षा अधिक ठिकाणी अस्तित्व आहे. यापूर्वी कंपनीची प्रतिस्पर्धी सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने मे महिन्यात १.६ अब्ज डॉलर्समध्ये २०% हिस्सा खरेदी करून येस बँकेत में महिन्यापर्यंत २४.२% हिस्सा खरेदी केला होता.

उपलब्ध असलेल्या या नव्या संबंधित व्यवहाराच्या अटींनुसार, जपानची MUFG प्रति शेअर ८४०.९३ रुपये या किमान दराने ४७.१ कोटी शेअर्स खरेदी करणार आहे. या कराराचा भाग म्हणून, जपानची MUFG प्रति शेअर ८४०.९३ रुपये दराने ४७.१ कोटी शेअर्सची खरेदी करेल जी सध्याच्या बाजारभावापेक्षा (CMP) ५% सवलत (Discount) आहे.

त्यामुळे या होत असलेल्या विक्रीमुळे श्रीराम फायनान्सच्या प्रवर्तकांचा (Promoter) भागभांडवल हिस्सा २५.४% वरून २०.३% पर्यंत खाली येणार आहे असे समजते सध्या अस्तित्वात असलेल्या सगळ्या अथवा सार्वजनिक भागधारकांचा हिस्सा एकूणच ७४.६% वरून ५९.७% पर्यंत कमी होईल. आर्थिक बाबतीत बघितल्यास निधी मिळाल्यानंतर, प्रति शेअर बुक व्हॅल्यू ३२१ रुपयांवरून ४२५.२ रुपयांपर्यंत वाढणार आहे.

ही गुंतवणूक इक्विटी शेअर्सच्या प्राधान्य वाटपाद्वारे (Preferential Allotment) पद्धतीने केली जाणार आहे. MUFG श्रीराम ओनरशिप ट्रस्टला २०० दशलक्ष डॉलर्सचे एकवेळ विविध कारणास्तव निधी देईल असे सांगण्यात येते. संबंधित MUFG ला श्रीराम फायनान्सच्या संचालक मंडळावर दोन नामनिर्देशित संचालक नियुक्त करण्याचा अधिकार देखील असणार आहे. त्यामुळे श्रीराम फायनान्सचे संचालक मंडळ १४ जानेवारी रोजी भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा (Annual General Meeting AGM) बोलावणार आहे. त्यामुळे आज कंपनीचा शेअर जवळपास ५% इंट्राडे उच्चांकावर पोहोचला असून ९०९ ते ९१० रूपये प्रति शेअर पातळीवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >