मोहित सोमण:आज भारतीय अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जीएसटी तर्कसंगतीकरण झाल्यानंतर झालेली जीएसटी दरकपात यामुळे लोकांची वाढलेली क्रयशक्ती, वाढलेली बचत व वाढलेली कमाई या एकत्रित कारणांमुळे आज कर्ज संकलनात (Tax Collection) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सीबीडीटी विभागाने (Central Board of Direct Tax) कर संकलनाची आकडेवारी आज जाहीर केली त्यानुसार इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत कर संकलनात ८% वाढ झाली आहे. संबंधित आकडेवारी १७ डिसेंबरपर्यंत आहे. एकूण कर संकलनात (Total Tax Collection) ८% वाढ झाल्याने कर संकलन १५७८४३२.५१ कोटीवरून वाढत १७/४७२५.२१ कोटींवर पोहोचले आहे.
कॉर्पोरेट कर संकलनात (Corporate Tax Collection) म्हणजेच औद्योगिक कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर ४.१६% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील ९२४८१३.८१ कोटींच्या तुलनेत या डिसेंबर महिन्यात ९९४५७७.२० कोटींवर वाढले आहे. दरम्यान कर परताव्यात (Tax Refund) इयर ऑन इयर बेसिसवर मात्र घसरण झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. आर्थिक वर्ष २२०४-२५ मधील डिसेंबर महिन्यात तो ३४३४९९.२३ कोटी होता तो आर्थिक वर्ष २०२५-२६ डिसेंबर महिन्यात घसरून २९७०६९.०२ कोटींवर पोहोचला आहे. तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे अँडव्हान्स कर संकलनात (Advance Tax Collection) मध्येही इयर ऑन इयर बेसिसवर ४.२७% वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर तुलनेत यंदा वाढ झाल्याने ते ७८३३८७.९२ कोटीवर पोहोचले आहे जे गेल्या डिसेंबरमध्ये ७५६०७८.५८ कोटी होते. इतर करात (Other Tax) संकलनतही इयर ऑन इयर बेसिसवर ४५.५५ कोटीवरून इयर ऑन इयर बेसिसवर २३.२५ कोटींवर घसरण झाली आहे. तर एसटीटी (Securities Transaction Tax STT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ४०११४.०२ कोटी रुपये तुलनेत किरकोळ वाढ झाली असून ते संकलन ४०१९४.७७ कोटीवर पोहोचले.






