मेस्सीच्या कार्यक्रम गोंधळप्रकरणी उत्तम साहाचे तथ्यहीन आरोप
कोलकाता : बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ‘अर्जेंटिना फॅन क्लब’चे अध्यक्ष उत्तम साहा यांच्यावर ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोलकाता येथील युवा भारती क्रीडांगणावर लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळावरून साहा यांनी गांगुलीवर तथ्यहीन आरोप केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.
१३ डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी कोलकाता भेटीवर आला होता. युवा भारती क्रीडांगणावरील या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर उत्तम साहा यांनी सार्वजनिकरीत्या सौरव गांगुलीवर गंभीर आरोप केले होते. या कार्यक्रमात गांगुलीने मध्यस्थाची भूमिका बजावली आहे.






