मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या मास्टरक्लास या उपक्रमाला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त योग जुळून आला. या उपक्रमाचा विषय “आउट ऑफ दी बॉक्स “हा होता . कार्यशाळा नालीदार (कॉरुगेटेड) व पॅकेजिंग बॉक्सचा कला प्रतिष्ठापना (Art Installation) या माध्यमासाठी सर्जनशील पुनर्वापर कसा करता येतो याची ओळख करून देते. दैनंदिन वापरातील टाकाऊ साहित्याचे अर्थपूर्ण, मोठ्या आकारातील कलाकृतींमध्ये रूपांतर करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे, ज्यातून कल्पना, भावना आणि सामाजिक मूल्ये व्यक्त केली जातात. याचे मार्गदर्शन माजी विद्यार्थी डॉ. सुमित पाटील यांनी केले . त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन लाभला.
रचना संसद महाविद्यालयाला जशी २५ वर्षे पूर्ण झाली तसे आउट ऑफ दी बॉक्स जाऊन पुटठ्याचा बॉक्स पासून दोन नवीन उपक्रम घेण्यात आले. ज्यात या बॉक्स पासून पौराणिक काळातील खेळ जसे पंचिशी बनवणे हा उपक्रम होता . या खेळात विविध शैक्षणिक पायऱ्या दर्शविण्यात आल्या होत्या . एका गटाने वृक्षाद्वारे इतिहासातील २५ तत्वांचा उल्लेख केला .
ही कार्यशाळा शाश्वतता आणि पर्यावरण जागरूकतेवरही भर देते, ज्यामुळे टाकाऊ साहित्य हे एक मौल्यवान संसाधन म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित होते. बॉक्स कापणे, दुमडणे, थर लावणे आणि जोडणी करून सहभागी कुटुंब, समाज, पर्यावरण, आठवणी किंवा कल्पनाशक्ती यांसारख्या विषयांची अभिव्यक्ती करतात. असे महाविद्यालाच्या मुख्याध्यापिका डॉ अदिती झा यांनी आपले मत व्यक्त केले.






