Monday, January 5, 2026

'प्रहार'च्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

'प्रहार'च्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर आयात वाढली

वसई : शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव, वसई तालुका अध्यक्ष दुशांत पाटील आदींनी प्रहार पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. वसई- विरार महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. भारतीय जनता पक्षाने बहुजन विकास आघाडीच्या नऊ माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, आणि राजकीय पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे काम भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर संघटन शक्ती वाढविण्यासाठी वसई-विरार शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ठाणे संपर्कप्रमुख तथा पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तसेच प्रहारचे वसई तालुका अध्यक्ष दुशांत पाटील, विरार शहर अध्यक्ष अतुल सावंत भोसले, वसई तालुका युवा संघटक राहुल पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, वसई-विरार निवडणूक प्रमुख व आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, मनोज बारोट,महेंद्र पाटील यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment