‘सार्वजनिक लँडस्केप’ श्रेणीत’ बेस्ट ऑफ द बेस्ट’ पुरस्कारावर मोहर
ठाणे : ठाण्यातील नमो ग्रँड सेंट्रल पार्कला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. आर्किटेक्चर मास्टर प्राइज २०२५ मध्ये या प्रकल्पाला सार्वजनिक लँडस्केप श्रेणीत “बेस्ट ऑफ द बेस्ट” पुरस्कार जिंकण्याचा मान मिळाला. हा शहरस्तरीय सार्वजनिक उद्यान प्रकल्प कल्पतरू लिमिटेड यांनी विकसित केला असून, एल ४९ यांनी डिझाइन केले आहे.
ही मान्यता प्रकल्पाच्या इकोसिस्टमसाठी सलग तिसऱ्या वर्षी मिळालेली असून, आंतरराष्ट्रीय डिझाइन मंचावर ठाण्याची ओळख दृढ करत आहे. मुघल गार्डन, जपानी गार्डन आणि चिनी गार्डन यासारख्या विविध थीम असलेल्या बागा विविध संस्कृती आणि त्यांच्या खास कला आणि स्थापत्य शैलींची झलक देतात.
आर्किटेक्चर मास्टर प्राइज हे जागतिक स्तरावर आर्किटेक्चरल, इंटिरियर आणि लँडस्केप डिझाइनमधील उत्कृष्ट प्रकल्प सन्मानित करते. यामध्ये डिझाइन उत्कृष्टता, नवोन्मेष आणि दूरदृष्टीचे दृष्टिकोन असलेल्या प्रकल्पांना उजाळा दिला जातो. कल्पतरू लिमिटेडच्या अधिकृत निवेदनानुसार, “नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे विविध वनस्पती आणि पक्षी प्रजातींचे घर असून, त्याच्या व्यापक आणि समावेशक लँडस्केप व्हिजनमुळे ठाण्याच्या हृदयभागाला एक सजीव आणि प्रवेशयोग्य सार्वजनिक स्थान बनवले आहे, जे समुदायाची संवादक्षमता वाढवते आणि शहरातील शहरी अनुभव सुधारते.”
नमो ग्रँड सेंट्रल पार्क, २० एकर क्षेत्रात पसरलेले आहे. ठाणे येथील बहुप्रतिक्षित ग्रँड सेंट्रल पार्कचे उद्घाटन ८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. न्यू यॉर्कमधील गँड सेंट्रल पार्क, दुबईमधील झबील पार्क, सिंगापूरमधील गार्डन्स बाय द बे आणि शिकागोमधील मिलेनियम पार्क यासारख्या प्रसिद्ध सार्वजनिक उद्यानांपासून प्रेरित आहे. , ठाण्याला हरित गिफ्ट म्हणून विकसित केले गेले आहे.राज्यातील हे पहिलेच मध्यवर्ती उद्यान आहे ज्यामध्ये ३ हजार ५०० हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. उद्यानातील झाडे अशा प्रकारे लावण्यात आली आहेत की ते अधिकाधिक पक्षी, हमिंगबर्ड्स आणि फुलपाखरांना आकर्षित करतात. येथे ३ एकर तलाव, तलाव किनारी सुंदर प्रॉमेनेड, आयकॉनिक ‘एक्स’ ब्रिज, चार थीमवर आधारित बागा (मोरोक्को, चीन, जपान, मुगल प्रेरित), आयकॉनिक स्ट्रक्चर्स, फिटनेस स्टेशन, चालणे व सायकलिंग मार्ग, ध्यान क्षेत्र आणि सर्व वयोगटांसाठी हरित परिसर उपलब्ध आहेत.






