मृतांच्या वारसांना ३५ लाखांची मदत जाहीर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत (MIDC) एका नामांकित कंपनीत आज भीषण दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत ६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ९ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना तातडीने मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
नवी दिल्ली : ऑनलाइन सट्टेबाजीशी संबंधित 1xBet अॅप प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीत भारतीय ...
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुटीबोरी एमआयडीसीतील संबंधित कंपनीत काम सुरू असताना अचानक ही दुर्घटना घडली. यात ६ कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. जखमी झालेल्या ९ कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या वारसांना आणि जखमींना खालीलप्रमाणे आर्थिक मदत जाहीर केली आहे, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत. संबंधित कंपनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ३० लाख रुपये देणार आहे. जखमींना प्रत्येकी १० लाख रुपये आणि त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी कामगार लवकर बरे व्हावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून प्रशासन आणि यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखला जात आहे."






