Friday, December 19, 2025

‘डिअर पँथर’ मराठी शॉर्टफिल्मची परदेशातही चर्चा

‘डिअर पँथर’ मराठी शॉर्टफिल्मची परदेशातही चर्चा

ऑस्कर नामांकित चित्रपट महोत्सवासाठी पात्र ठरलेला मराठी लघुपट ‘ डिअर पँथर ’ याची लंडन इथल्या प्रतिष्ठित लिफ्ट-ऑफ ग्लोबल नेटवर्क – लंडन लिफ्ट-ऑफ फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये अधिकृत निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी हा महोत्सव एक महत्त्वाचा आणि विश्वासार्ह मंच मानला जातो.

सामाजिक वास्तवाचे प्रभावी व संवेदनशील चित्रण करणारा ‘डिअर पँथर’ हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या लघुपटाची कथा एका पीएच.डी. विद्यार्थ्याभोवती फिरते, जो आपल्या हक्काच्या घरासाठी स्थानिक महानगरपालिकेशी झुंज देतो. ही केवळ वैयक्तिक लढाई नसून, शासकीय अन्याय, व्यवस्थात्मक दुर्लक्ष आणि वाढत्या सामाजिक विषमतेविरुद्धचा व्यापक संघर्ष आहे. ‘असलेले’ आणि ‘नसलेले’ यांच्यातील वाढती दरी अधिक तीव्र होत असताना, ‘पँथर’ हे पात्र दडपल्या गेलेल्या वर्गाचा आवाज बनून पुढे येते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >