Friday, December 19, 2025

पहिल्या सत्रात डॉ लाल पॅथलाब्स शेअर ५१% कोसळला पण....

पहिल्या सत्रात डॉ लाल पॅथलाब्स शेअर ५१% कोसळला पण....

मोहित सोमण:डॉ लाल पॅथलाब्स कंपनीचा शेअर आज ५१% इंट्राडे निचांकावर कोसळला आहे. त्यामुळे शेअर १३५९.१० रूपयांवर पोहोचला आहे. शेअर मोठ्या प्रमाणात कोसळला तरी गुंतवणूकदारांना चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर घोषणा केली होती. होता. १:१ शेअर बोनस शेअर कंपनीने घोषित झाल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये आज अँडजस्टमेंट झाली ज्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत कमी झाली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले जाते. सकाळी सत्राच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात कोसळला ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आज कंपनीच्या स्प्लिट बोनस शेअरचा एक्स बोनस डेट आहे. कंपनीने घेतलेल्या अथवा खरेदी केलेल्या शेअर गुंतवणूकदारांना बोनस शेअर मिळणार आहे. सामान्यतः बोनस शेअर आज किंवा उद्या खरेदी करणारे या योजनेचे लाभार्थी नसतात.

दरम्यान मात्र एक्सचेंजच्या नियमांनुसार रेकॉर्ड तारखेच्या एक ट्रेडिंग दिवस आधी शेअर्स एक्स-बोनस मिळत असला तरी भारताच्या नव्या T+1 सेटलमेंट सायकलमुळे, एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट एकाच दिवशी येत आहेत त्यामुळे काल १८ डिसेंबर रोजी डॉ. लाल पॅथलाब्सचे शेअर्स धारण करणारे गुंतवणूकदार बोनस इक्विटी शेअर मिळण्यास आज पात्र आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने पात्रतेसाठी आजची १९ डिसेंबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती.

एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार बोनस १:१ या प्रमाणात जारी केला जाणार आहे, म्हणजेच प्रत्येक विद्यमान १० रुपयांच्या पूर्ण पेड-अप इक्विटी शेअरमागे १० रुपयांचा एक पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर वाटप गुंतवणूकदारांना केला जाईल. भारताच्या T+1 सेटलमेंट सायकलमुळे, केवळ १८ डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी शेअर्स खरेदी करणारेच पात्र असणार आहेत. उद्यापासून शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर मिळणार नाहीत. सकाळी ११.४२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये एक्स स्प्लिट नंतर २.५९% घसरण झाली आहे.

डॉ. लाल पॅथलाब्स ही एक अग्रगण्य भारतीय ग्राहक आरोग्यसेवा निदान प्रदाता कंपनी आहे, जी प्रयोगशाळा आणि रुग्ण सेवा केंद्रांच्या विस्तृत जाळ्याद्वारे पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी चाचण्यांची विस्तृत श्रेणी प्रदान करते. तिमाहीतील निकालात कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर १०.७% महसूलात वाढ झाली होती तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर १६.४% वाढ झाली होती. ज्यामुळे कंपनीचा महसूल ७३१ कोटी व करोत्तर नफा १५२ कोटींवर पोहोचला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >